दोष नेमका कोणाचा......?. डाग दिसतात चेहऱ्यावरचे म्हणून तीनं स्कार्फ गुंडाळला आणि दळण दळणयासाठी गिरणीच्या दिशेने वाट निवडली. घराला लाँक लावला आणि दळणाचा डबा कमरेवर ठेवणार तोच शेजारच्या काकूंनी आवाज दिला... '"अग अश्विनी किती सहन करनार आहेस अजून ,जा आईच्या घरी निदान दोन वेळेच जेवण तरी मिळेल तिथे,इथं या नराधमाच्या तावडीतून सुटशील तरी एकदाची.'" पण ती चेहर्यावरचा स्कार्फ सांभाळत डबा उचलून निघाली . घरापासून काही अंतरावर गिरणी होती.तीला पाहून गिरणीवाला पण थबकला. गेल्या ६ महिन्यात त्यालाही सवयच झाली होती हिला या अवस्थेत पहायची. लई थाटामाटात लग्न करून आणलं होत अनिलनं तिला. आख्खिचाळ गेलती लग्नाला. स्वर्गातून जोडा जमिनीवर उतरला होता जजणू. काय सुंदर दिसत होती आश्विनी आप्सरा पण कमी सुंदर दिसते .पहिल्या दोन महिन्यात काही कमी नव्हती गोडी संसारात पण जेव्हा पासून नवीन घरात प्रवेश केला तेव्हा प...