Posts

Showing posts from April, 2018

रंग बेरंगी चितेचा

......... रंग बेरंगी चितेचा...                       खरच आकाश निळ्या शाई ने भिजलेला असतो जेव्हा तो उन्हाच्या झळ्याने बदडलेला असतो ..कधी कधी ते ढगं जळुन काळी ही होतात बरंका.. आणि काळी झाली म्हणुन ती रडताही... कधी थोडी तर कधी वेगाने.. कधी कोणाच्या दुःखात रडतात तर कधी कोणाच्या सुखात रडतात.. कधी दुस-यांना रडवतात तर कधी कोणाचे रडु् लपवतातही....ढगं रडली ना की मग बागेत व इतरत्र रंगबिरंगी फुलं उमलतात मग चहुकडे हिरवळ दाटु लागते... वसंत पंचमी बहरते... फुलांवर ना ना प्रकारचे फुलपाखरु डोलु लागतात... नवी- पालवी फुटलेलं हिरवं झाडही मग वा-याच्या लहरीत नाचु लागतात... रम्य परीसराने बहलेलं हे वातावरण नव-नव्या प्रेमाची गाणीं म्हणतात ....दरी -खो-यातुन शुभ्र पांढ-या रंगाचे पाणी वेगात वाहु लागतात... झ-यातुन वाहताना त्या पाण्याला ही खळ-खळुन गीत म्हणावसं वाटतं आणि तो त्या गीताच्या तालावर नाचतो सुद्धा... मग आकाशातुन रडनारे ढगं जमीनीला भेटन्यासाठी आतुर होतात                    मग त्यातले काही अश्रु हवेत तरंगतात आणि त्या इंद्रधनुष्याच्या स्वाधीन होतात... मग सात रंगांचे लहर तयार होते तांबडा,नारंगी,पिवळा,हिरवा,न

रविवार ..

रविवार.... सकाळी फोन आला आईचा... 'मी आणि भाऊ जेवायला येतो तुझ्याकडे ' .....एकच दिवस मिळतो सुट्टीचा त्यात पन कोनी आलं घरी की एक्सट्रा काम वाढतं... नको वाटतं खरतर.... चिड चिड होते.. पन काय करनार पाहुनचार करन्यापलीकडे गत्यंतर नसतो....  'नाही मी आत्ताच नाश्ता केलाय ग आई! मी स्वयंपाक नाही करनार ' ...म्हनुन मी चिडुन उत्तर दिलं तीला.... 'त्यापेक्षा तुच बनव ना काहीतरी... मी आणि बाळ(माझा मुलगा) येतो जेवायला' ......     मी अस म्हनताच तीची बडबड चालु झाली... ''आळशी कुठली काम नको करायला ''.....मी फोन कानापासुन लांब धरला.... जरा बडबड कमी झाली 'ये मग जेवायला '' ...वाक्य कानावर पडले आणि मी पुन्हा हसत फोन कानाजवळ आणला..... 'बरं बरं येते....... कामं आटपुन सगळे '.....   रविवार म्हनला की आठवड्याभराची कामं आली.... त्यात कपडे म्हनायचे स्कुल यूनिफार्म आले, मग बेडशीट त्याचा सोबती उशीची कवरं, माझा एप्रन (कामावरचा कोट)  आला.... मग भांडे म्हटलं की त्यात सकाळ्या नाशट्याचे भांडे.,मग शेगडी -किचन वट्टा आला... तसतर रोजच ऐक हात फेरला जातो सफाईचा पन रविवारी

अनोळखी मैत्री

अनोळखी  मैत्री....... आणि आठवण.. ऩेहमी तिला छळनारी ही गोष्ट!का कोणास ठाऊक आठवली की जनु पुरच वहायचा डोळ्यातुन... जनु काय त्या एकांती कोणी समोरही आलं तरी हिला आणि हिच्या अश्रुनां सांभाळण कठिन होनार होतं .. अशावेळी तिला ''काय ग काय झालं आज ईतकी का गप्प तु '' असंही विचारनं चुकीचंच वाटेल त्याला .. आणि पाहीलं तर हे चुकीचंच अशनार 'तिच्या द्रुष्टीकोनातुन ' कारण ह्या गोष्टीची भर कोणि तिला भरुन देनारं न्हव्तच 'तिच्या आयुष्यत... असं तिला वाटत जेनेकरुन एक व्यक्ति होता तिच्या आयुष्यत ''जो ही उरलेली जागा पुर्नपने नाही पन थोडीशी का व्हाईना भरतच होता... ''पन '' हा शब्द कुठेतरी मनात घर करुन बसलेला होता हे मात्र खरयं .. ही गोष्ट आजच का तिला ईतकी बैचेन करते ?? हा प्रश्न ''जेव्हा तिचा कॉल आला आणि हुंदक्या आवाजात ति म्हनाली ''मला बोलायच आहे तुझ्याशी '' तेव्हाच मी समजुन घ्यायच होतं... कि हिचा हुंदका मलाही तितकाच बेचैन करनारा होता.... निघाले तर होते मन घट् करुन तिला भेटायला, स्वतालाही समजावत होते की तिला या क्षणी माझी गरज आहे ,क

ति दोघं

त्याने ती ला बोलायला हवं होत.........(ती शेवटची भेट होती) ...                अस खुप वेळा घडत ना आयुष्यत की जे बोलायच असत ते बोलायला आपले शब्द आणि मन कासावीस होते........ आणि भलतच काहीतरी बोलुन बसतो.... ज्याचा काही अर्थही नसतो.. आणि वेळ व्यर्थही फसतो.....तसच आहे ह्या दोघांचही.. तीने नुकतीच अकरावीची परीक्षा पार केली होती.. आणि टाईम पास म्हनुन तो जॉब केला होता जो तीला तीच्या शेजारच्या काकुने ओळखीने लावला होता.. म्हनजे चार दिवसीय काम होत ते तस आणि तीला बारावीला मदत होईल जरा.... म्हनुन होकारार्थी हा जॉब तीने स्वीकारला... (  चार दिवसांचा इलेक्शन सर्वे)... त्या दिवशी एक पत्रकार आला होता ती व त्याने ठरवलेल्या ग्रुपला भेटायला... त्यांच्या त्या ग्रुप मध्ये ही नवीनच होती.. हीची फक्त शेजारच्या काकुशी ओळख होती..... त्या ग्रुप मध्ये तीन मुली नी तीन मुलं असा तो ग्रुप होता..... पन तीचा स्वभाव इतका आकर्षक करनारा होता की अवघ्या पंधरा मिनटांत तीने सगळ्याशी स्वताची ओळख करुन घेतली.... त्याच ग्रुप मध्ये तो ही होता त्याला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडली... हे त्याला कळाले होते आणि तीलाही... कामाच्या पहील्य