ति दोघं

त्याने ती ला बोलायला हवं होत.........(ती शेवटची भेट होती)

...                अस खुप वेळा घडत ना आयुष्यत की जे बोलायच असत ते बोलायला आपले शब्द आणि मन कासावीस होते........ आणि भलतच काहीतरी बोलुन बसतो.... ज्याचा काही अर्थही नसतो.. आणि वेळ व्यर्थही फसतो.....तसच आहे ह्या दोघांचही.. तीने नुकतीच अकरावीची परीक्षा पार केली होती.. आणि टाईम पास म्हनुन तो जॉब केला होता जो तीला तीच्या शेजारच्या काकुने ओळखीने लावला होता.. म्हनजे चार दिवसीय काम होत ते तस आणि तीला बारावीला मदत होईल जरा.... म्हनुन होकारार्थी हा जॉब तीने स्वीकारला... (  चार दिवसांचा इलेक्शन सर्वे)... त्या दिवशी एक पत्रकार आला होता ती व त्याने ठरवलेल्या ग्रुपला भेटायला... त्यांच्या त्या ग्रुप मध्ये ही नवीनच होती.. हीची फक्त शेजारच्या काकुशी ओळख होती..... त्या ग्रुप मध्ये तीन मुली नी तीन मुलं असा तो ग्रुप होता..... पन तीचा स्वभाव इतका आकर्षक करनारा होता की अवघ्या पंधरा मिनटांत तीने सगळ्याशी स्वताची ओळख करुन घेतली.... त्याच ग्रुप मध्ये तो ही होता त्याला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडली... हे त्याला कळाले होते आणि तीलाही...
कामाच्या पहील्या दिवशी सकाळीच सगळ्याची जोडी जोडीने विभागीय काम त्यांच्या हतात देन्यात आले होते..... ती खुप आनंदीत होती कारण तीला हवा होनारा जोडीदारच तीला मिळाला होता... तो मात्र जास्त react करत नह्वता.... सगळ्या जोड्या वेगवेळ्या विभागुन दिलेल्या वाट्याला निघाले...... 'मी मयुर ' त्यानेच बोलायला सुरवात केली 'मी प्रेरणा '...'काय करतोस तु? म्हनजे जॉब की कॉलेज '........हीनेही प्रश्नार्थी बोलायला सुरवात केली.... 'मी कॉलेज करतोय  D pharmacy करतोय .....हे येनारं year last year आहे.... '..ती हसली... न चालायला लागली.. 'तुु का हसली ...?..माझ मराठी language थोडं week आहे... मी भोपाल मध्ये होता... On staying the Hostile...''म्हनुन मला मराठी येत व्यवस्थित बेलायला नाही येते.... माझे मराठी असेच येते तु शिकवल का माला बोलायला''.. ती हसुन म्हनाली 'हो शिकवेल मी तुला ...मयुर''...... छान झाली सुरवात दोघांचीही त्याच्या तुटलेल्या मराठी भाषेला ही जोडत होती... तोही तीला समजुन घ्यायचा पन दोघांनी एकमेला स्वताच्या सवयवाची जानिव करुन दिली नाही.... त्यांच्या दोघांमधला हा लाब-जवळचा खेळ बाकीच्यांनच्या लक्शात आले होते... कदाचित् म्हनुन त्यांच्या मध्यस्ती कोनी नह्वते.. कामाच्या व्यापात ती दोघही एकमेकांच्या इतकी जवळ येवु लागली होती.. की त्यांनच्या लक्शात आलेच नाही... आज कामाचा शेवटचा दिवस11 होता... गेल्या चार दिवसात ते दोघेही एकमेकांना समजु लागले होते... 'मग काय करनार उदया तु '..त्याने ती ला विचारले... 'काही विषेश नाही... Means nothing special ''...'मग कुठेतरी जावुया बाहेर ''म्हनत त्याने तीचा हाथ धरला व जरा जवळही आला...... तीचा हा अनुभव पहीला होता ...तीनेही 'हो जावुया.. सकाळी ये इथेच.... बाय '-म्हनुन ती घरी तर आली होती पन स्वताला त्याच्या स्वाधीन करुन....मोबाइल नसल्यामुळे कदाचित् ती नाराज होती... पन तीने गुपचुप वडीलांच्या फोन मधुन त्याला मेेसेज केला... 'गुड नाइट we met tomorrow at station... This is my dad's number don't msg hear by. ''.....दुस-यादिवशी ती भेटताच त्याने विचारले 'तु मोबाइल का नाही युज करत ''...''after 12th  ..आत्ता नाही बाबा नाही aloud करत आत्ता... ''...''चल कुठे जायच ?..  गार्डन ला जावुयाका... ''...डोक्याला हात लावत ''अरे एवढ्या सकाळी कुठे गार्डन open असत''... ''मग तु सांग मी तर नविन आहे ईथे मला जास्त knowledge नाही ''....
''अम्म्म ओके चल दुर्गा टेकडीला जाऊ.. जवळ पन आहे आणि safe also... ''...'ठीक आहे चल मग '' ...म्हनुन दोघेही ऑटो ने निघाले..... ऑटोमध्ये पन त्याने तीचा हात धरला होता.... तीनेही नकारार्थी काही react  केले नाही.. त्याने ऑटोतुन उतरुनहा तीचा हात सोडला नह्वता..... ''आपन वरती जाऊया चल.''..म्हनुन ती त्याला टेकडी वर घेवुन गेली... तीथुन सुंदर देखावा... हीरवळ नजारा पाहत ती दोघही जागा शोधुन बसली खरी एकमेकांसोबत..पन काय बोलायच हे मात्र कळेना....''.तु पुढे काय करायच ठरवलय ''.त्यानेच सुरवात केली.... ...''मी परवा गावी चालले पंधरा दिवसासाठी आल्यावर मग कॉलेज ''.. मग खुप सा-या गप्पा झाल्या..या सरवात त्याने तीचा हाथ काही सोडला न्हवता.. अच्छा म्हनत तो शांत झाला... तीने अलगद त्याच्या खांद्यावर डोकं ठेवल आणि दोघेही त्या निखळ हिरवळी कडे पाहत राहीले........
... . एकमेकांची ओळखही झाली आणि वेळही त्याच्या मर्जीने निघत राहीला...''अरे 4:30 झाले चल निघायला हव.. नाहीतर खुप उशीर होईल''....... म्हनत ती निघाली... ''चल मयुर चल लवकर.... ''..ती उठली त्याने तीचा हाथ ओढला नी म्हनाला उदया  भेटशील का... माझे pharmacy चे exam आहे मग मी नाही परत time मिळनार... ''...
''अरे नाही मी उदया नाही येनार packing करायची आहे ना मला आणि Dad घरी असतील'' ..बोलता बोलता ते दोघेही टेकडी उतरु लागले...
''तु काय feel करते माझ्याबद्दल? काय वाटते तुला... ''
तीने हसत 'हाच question मी तुला विचारला तर तु काय answer देशील. ''...
''तु आवडते मला ''  .....we are good friends and ''....
''And ?काय सांग की '' ....त्याच्याकडे बघत.... ''बोल ना मयुर.... ''
''Nothing''.... गावावरुन आली की भेट मला ''....म्हनत तो निघुन गेला त्याच्या वाटेला...... कदाचित् त्याला जे बोलायच होत ते हीला कळाल नसाव किंवा तीला जे ऐकायच होत ते त्याला जमल नसाव... आणि मग पंधरा दिवसांनी झालेली त्यानची ती भेट....

''हेलो... हाय मी येते तुला भेटायला (हो ये) ... आज जमेल ना तुला.(होहो मी तिकडेच निघालोय)..... . मग ये तुझ्या क्लास पशी ''..(ओके येतो).... कॉल ठेवुन ती निघाली होती 'रिक्शा '..त्याला भेटायच होतं म्हनुन साधा नाश्ताही नाही केला तीने... किती ओढ लागली होती त्याला पहायची बा...परे ..'हाय !कसा आहेस' अजुन तो तीच्यापासुन चार हात लांबच होता... तोवर हीला काय दम निघतोयका... 'मी बरां आहे... तु कशी आहेस? कधी आलीस ?'...ती गावी गेली होती पंधरा दिवसांसाठी... 'आजच आले रे.... पहाटेची ट्रेन होती'...... दोघेही formality सारखच बोलत होते... एवढ्या दिवसांनी भेटतायेत न अजुनही एकमेकांन मधल अतंर काही केल्या कमी कतर नह्वते... 'हे घे तुझ्यासाठी' ..म्हनुन एक गिफ्ट तीने त्याला दिल पन तेही अवघडल्यासारखच ..''मी कॉल केले होते तुला पन तुझा फोन बंद होता''.. ''हो exam होती ना म्हनुन बंदच ठेवला होता... ''.........''अच्छा चल मग येते''  म्हनुन ती निघाली पन मनात शंका व प्रश्नांचा घोळ घेवुन........अरे ती नाही काही बोलत तर त्यानेतरी ती ला बोलायला हव होत .....मग ती नक्कीच त्या दोघांसाठी शेवटची भेट नसली असती कदाचित् ...(पंधरा दिवसानंतरची ही भेट (शेवटची) होती)......

ती आणि तो..... कदाचित् मनातल बोलायला हवं होतं...

रिंकी कुलकर्णी...

Comments

Popular posts from this blog