एक अनामिक नातं

एक अनामिक नातं

       '' काय ग नाराज आहेस का? '' सहज हळुवार श्वासात दबक्या आवाजात त्याने विचारलेला प्रश्न... गेल्या चार-पाच महीन्यात कोन जाने किती कॉल केले त्याने मला. मी एकाही कॉल उचलला नव्हता. मेसेजही केला नाही त्याला की कुठल्याप्रकारचा रिप्लाय ही दिला नाही........ त्याला टाळत वैगेरे होते अस नाही तर खरच मला वेळ मिळत नव्हता... आणि वेळ मिळाला तरी मला कॉल करायला जमत नव्हत कारण... कारण जरा वेगळच होत... तरी त्याने कॉल उचल्यावर तोच प्रश्न विचारला ज्याची मला आपेक्षा होती.... ...
             ''नाराज नाही मी!..... वेळ आणि काळ जुळुन आले नाही इतकंच ''...मीही नेहमीप्रमानेच त्याला उत्तर दिलं कारण त्यालाही तीच आपेक्षा होती आणि माझ उत्तर त्याच्या आपेक्षेवर खर ठरलं... जेव्हा त्याने मोट्ठा श्वास घेतला... आणि एक कॉमन प्रश्न विचारलं.. जे तो नेहमी विचारतो... बाकी- काय म्हनतेस.. ?.....आणि आम्ही बोलु लागलो....आगदी त्या क्षणाला बिलगुन.... आगदी त्यात सामावुन.... अगदी एकमेकातल अंतर मिटवुन... हे आमच्या दोघांच्याही आयुष्यातले ते अनमोल क्षण असतात.. जेव्हा तो फक्त माझा आणि मी फक्त त्याची असते...खुप काही असतं तेव्हा बोलायला... एकंदरीत तो क्षण आम्ही जगतो..... कारण पुन्हा वेळ नाही मिळाला नाही तर.... हो.. कदाचित् हा ही एक प्रश्न असतोच आम्हादोघात पण ठिक आहे ना नंतर चा विचार तो ही नाही करत आणि मी ही नाही करत....
     माझा मुलगा आणि त्याचा मुलगा एकाच वर्गात होते... आम्ही अँनुयल फंक्शन मध्ये भेटलो... सहजची ओळख झाली... जवळ जवळ दोन -तिन महीने तो फक्त पाहायचा... कधी बोलायच धाडस नाही केल पण.. मला न भेटता (पाहता) जायचा नाही.... मला लेट झाला जायला की तो वाट पाहत उभा रहायचा.. मुलांना खाउ देण... गाडीवर फिरवण... हे असकाहीतरी चालु असायच.... जानवायच मला ह्या सगळ्या गोष्टी पण... भीति वाटायची मी व्यक्त व्हायला..... तो सोमवार चा दिवस होता.. माझ्या मुलाला बरं नव्हत म्हणुन मी त्याला स्कूल ला पाठवलं नाही.... तिन -चार दिवस झाली सुट्टी... मग शनिवारी स्कूल ला पाठवलं त्याला... म्हनजे मीच गेली होती सोडायला ....स्कुलच्या गेट जवळ पोहचल्यावर समजल की माझीही कोनीतरी आतुरतेने वाट पाहत उभ असायच..... सकाळची वेळ होती तसाही मला उशीर झाला होता जरा कोनी नव्हत... पण तो उभा होता माझी वाट पाहत....मुलाला सोडुन मी निघाले.. आणि त्यानी गाडीला कि्क मारली...माझ्या जवळ आला आणि जरा रागातच म्हनाला... ''बसा जरा बोलायच आहे मला.. प्लीज़''.....मी काही न विचारता बसले त्याच्या गाडीवर.. कारण घडणा-या गोष्टीचा मला अंदाज होता....... स्कुल पासुन एक दहा मिनटांच्या अंतरावर गार्डन होत तिथे आम्ही गेलो... गाडी थांबवुन मी गार्डन मध्ये जावुन बसले.. तो ही येवुन माझ्यापासुन एक हाथ लांबच बसला.... काही बोललाच नाही... दहा मिनीटे झाली दोघेही फक्त एकमेकांकडे बघत बसलो.... तेही नजरा चोरुन.... वेगळीच होती ती वेळ..  
                         अबोल पन बोलणारी
                             शांत पण समजणारी
मग त्याने माझा हाथ त्याच्या हातात घेतला... ज्या हक्काने त्यान्  माझा हाथ उचलला त्याच हक्काने मी ही माझा हाथ त्याला घेवु दिला....मग जरा जवळ येवुन बसला तो माझ्या मी ही दुर सरकण्याचा प्रयत्न नाही केला.... न तो काही बोलला न मी काही बोलले.. बस फक्त एकमेकांकडे बघायचो.. अलगद हसायचो.... जितकं तो मला गप्प राहुन समजायचा प्रयत्न कारायचा तितकीच मी ही त्याला समजुन घेत त्याच्यात स्वताला शोधायची... तो मला काही क्षणांसाठी वडापीसा पहायचा... मी ही त्याच्यात रमायची.... जगा वेगळ हे नात कसं आणि का निर्माण झाल.?.. याच उत्तर ना मी विचारल कधी ना त्याला विचाराव वाटल... हे असच चालत राहनार नातं आमचं
                  आणि ह्या नात्याला चालवत न्यायच असच... कुठल्याही मार्गाची आपेक्षा न बाळगता.... हे आम्ही दोघांनीही पहिल्या भेटीत ठरवल... फक्त या अटीवर राहायच... न भेटता.. न बोलता... एकमेकांत जगत रहायच....

जगाचा विचार न करता.........

रिंकी कुलकर्णी........

Comments

Popular posts from this blog