Posts

Showing posts from December, 2018

गझल

Image
गज़ल 

चारोळी

क्या पता था कि महोब्बत ही हो जायेगी, हमें तो बस तेरा मुस्कुराना अच्छा लगा था.. रिंकी

झोपनगरच्या चौकात

Image
झोपनगरच्या चौकात तुझ्या, इश्काचा सिग्नल हिरवा होतो त्या हिरव्याशा गोड होकाराने , माझ्या झोपनगरीत मी स्वप्न रंगवतो #रिंकी

तु ये ना पुन्हा

तु ये ना पुन्हा... सोबत चालना-या अबोल्या सावलीला बिलगून चालणारी पाऊलवाट होवून तु ये पुन्हा तुझ्या मखमली ओठांचा स्पर्श होताच माझा सावळा रंग खुलतो त्या रंगात न्हाऊन तु ये पुन्हा पावसाच्या हलक्या सरी सोबत मातीच्या गंधात मिसळून गंधाच्या सुगंधात उमजून तु ये पुन्हा गुलमोहरावर धुक्याची रास रचून तो गारवा मोहरतो तसं गारव्याची शाल पांघरून तु ये पुन्हा #रिंकी..

आसवाची कविता

                       काळजाच्या उंबरठ्यावर,                            येवून अडकली ...                         त्याच्या आसवांनी ,                           लिहीलेली कविता...        #रिंकी

प्रभात काल

      त्याला बघून खुलते ,      तिच्या खळीवर लाली ...    जसा उमलावा गुलमोहर ,          रोज प्रभातःकाली... #रिंकी

ऊन

           माझ्या प्रीतीच्या उन्हाला,               तुझ्या सावलीची ओढ ...                    नाजुकशी खळी गाली,                        जशी साखरे हून गोड .. #रिंकी

नज़ाकत

ए दिल जरा नज़ाकत से पेश आना के फिर एक बार जनवरी में मुलाक़ात होगी किया है उसने भी पुरा साल इंतज़ार के फिर ये सर्द यादें दिसंबर के हवालात होगी #रिंकी

गझल

तकल्लुफ के साथ चलते जाता है ख़ुद - वो गुज़रता वक़्त संभालने का सुझाव देता है ठोकर बिछाये थें उन राहों पर मैने सुना साथ चलने वालों को छाले पाँव देता है सिसक कर चलती है जो उन राहों कि फ़िक्र लगाकर नमकीन मरहम वो दिल घाव देता है कुछ रोज़ गीली कर लेतीं हूँ रातों की नींदीया जरासी आनें के उम्मीद पर वक़्त ठहराव देता है #रिंकी

गुलमोहराची सावली

गुलमोहराच्या सावलीला बिलगून , माझ्या गारव्याचा सुंदर होवून तु ये पुन्हा  ... त्या गंधाळलेल्या सुगंधाच्या गारव्याची,     शाल पांघरून तु ये ना पुन्हा ..... #रिंकी

नियतीचा खेळा

   किती रात्र चालावा नियतीचा खेळा    मंदिराच्या बाहेर बसतो देवांचा मेळा कोणी पुजतो दगड कोणी माणसांत शोधिला देवा तुला शोधू कुठे आणि शोधू किती वेळा #रिंकी

उब

आयुष्याच्या गारव्याला तुझ्या प्रेमाच्या शेकोटीने एक अलगूज उब मिळावी त्या शेकोटीच्या उबेलाही आपल्या आयुष्याची सोहबत खुब मिळावी

मुक्त छंद

कधी कधी वाटतं खूप रडावं, उशाशी आधार घेऊन तुझ्या स्वप्नात पडावं, स्वप्न मी पहावं तु रात्र होशील का, अंधारात चांदण्याचा दिवा तु हाथी घेशील का. जागेपणी झोप यावी तु अलगूज निज हो , निजही निजते बघ तु हलका सा अनुवाद हो. स्वप्नातल्या राजकुमारासारखा घे घोडस्वारी, मग मी ही घेईल आकाशी नितांत भरारी. तो संध्याकाळी चा गारवा तु जाताना देवुन गेलास,  हलकी शी हितगूज ती हव्याचा सोबती लेवून गेलास.असाच लोभ तुझ्या येण्याचा राहू दे, काळजाच्या एका कोपर्यात मलाही हक्काने पाहू दे राया मलाही हक्काने पाहू...... #रिंकी......

इश्काचा पिसारा

ह्यो तुझा अल्लड सा साज, माझ्या पिरमाला लाजवीतो तुला बघून येडं काळीज, ढोल इश्काचा वाजवीतो त्या ढोलकिच्या तालावर मन नाचतो काहूरा सखे तुला बघून खुलतो ग माझ्या इश्काचा पिसारा.. ।धृ। रोज सपनात बांधीतो ग, तुझ्या नावाचा मी झूला गंध दरवळतो बहरुन ए माझ्या मोगरीच्या फुला तुझ्या केसाला बिलगून दरवळतो गंध सारा सखे तुला बघून खुलतो ग माझ्या इश्काचा पिसारा ।धृ। माझ्या प्रीतीच्या उन्हाला, तुझ्या सावलीची ओढ नाजुकशी खळी गाली,  जशी साखरे हून गोड तुझ्या ओठांवरच्या गोडीला मी आशिक आवारा सखे तुला बघून खुलतो माझ्या ग माझ्या इश्काचा पिसारा #रिंकी ..

उसान

आई तुझ्या उसानाला का ग लळा लावीला  । धृ । सुकं पडलं शिवार , तापला ह्यो रान सारा जड झालेल्या पाण्याचा आता बाजार लावीला आई तुझ्या उसानाला का ग लळा लावीला  । धृ । कुठं भेटलं ग थोडं, बघ सुटाना ह्यो कोडं माझ्या सावलीला ह्या उन्हाने झळा लावीला आई तुझ्या उसानाला का ग लळा लावीला  । धृ । वंशाच्या दिव्यापायी, माझ्यानशिबी भोगाई तुझ्या पदराला श्रापाचा बघ आंदन लावीला आई तुझ्या उसानाला का ग लळा लावीला  । धृ ।

चारोळी

तु छेड मेहफिल गुंफणांची रच तृप्त शब्दांची जाळी मी लावेल लय शब्दांना..जर तु होशील सूरांच्या बागेचा माळी