उसान


आई तुझ्या उसानाला का ग लळा लावीला  । धृ ।

सुकं पडलं शिवार , तापला ह्यो रान सारा
जड झालेल्या पाण्याचा आता बाजार लावीला
आई तुझ्या उसानाला का ग लळा लावीला  । धृ ।

कुठं भेटलं ग थोडं, बघ सुटाना ह्यो कोडं
माझ्या सावलीला ह्या उन्हाने झळा लावीला
आई तुझ्या उसानाला का ग लळा लावीला  । धृ ।

वंशाच्या दिव्यापायी, माझ्यानशिबी भोगाई
तुझ्या पदराला श्रापाचा बघ आंदन लावीला
आई तुझ्या उसानाला का ग लळा लावीला  । धृ ।











Comments

Popular posts from this blog