Posts

Showing posts from July, 2018

वक्त

वजह कि तलाश ना कर तू राह-ए-सफर चलता जा सोहबत कि परवा ना कर तू वक्त-ए-जिंदगी ढलता जा

धागा

अंतराच्या धाग्याला चिरुन, हळव्या पाऊल वाट्यावरून, विरहाच्या विरंगुळावरून, हरवलेल्या मौनेच्या भाषेवरून, कधीकधी तो..... सांजवेळी विरहातून होणार्या आतूरत्या भेटीवरून , त्या भेटीतल्या सहवासात उमजनार्या मिठीवरून , नजरेनं नजरेच्या स्पर्शाला बिलगून होणार्या हर्षावरून , मनाच्या गाभार्यातून ओठांच्या कोपर्यापर्यंत येणारा हुंदका ........

नाकबूल मी

नाकबूल मी ? बाबा बाबा देता हाक् माझा आवाज रे बसला , मुलगी मी तुझीच, मग का रे असा तू माझ्यावं रुसला. ओढ होती तुजपाशी प्रेमाची, लाडाचे होते आस , अंश होते तुझेच मी, तरी तुला वंश का वाटे खास. प्रेमापोटी आतुरले मनं, हेलावून गेला तूझा आभास , मुलगी मी तुझीच, तू नाकारले मज हाच नं तूझा अट्टाहास . दोन शब्दांच हक्कच प्रेम ,मी मागीतल नाही तूजला, असे -कसे लोटले तू नाते, का नाकारलस मजला. कधीतरी घेऊन जवळी ,तू मायेची देशील थाप , पाणावले डोळे पुसून घेतले, कारण तूच माझा बाप . एकांती कधी शोधता शोधता हरवते माझे अस्तित्व , गहिवरून येता क्षणते ओले, वंशांची भुक हेची का महत्व . हसून जन्म घेतला मी ,तूला स्त्रीलिंगी नाही पटले , बापाच्या प्रेमाला आतुरला काळीज, मी नर म्हणून नटले . बाबाबाबा म्हणुन तूजला, आठवणींत आश्रृही बरसले , दोन शब्द प्रेमाचे ऐकायला ,माझे कान आयुष्यभर तरसले . भरलेल्या डोळ्यांतील जखमी पाणी सांग मी कसे आवरू , अबोल भावनांचा उद्रेक होई,सांग मी त्यांना कसे सावरू. #रिंकी