Posts

Showing posts from September, 2018

अरुंधती

सकाळ च्या पहिल्या किरणांसोबत जशी आतूरलेली पाखरं बिलगून पुन्हा नव्या उमेदीने आकाशी झेप घ्यायची  अगदी तसचं व्हायचं माझं जेव्हा समोरच्या गॅलरीत ती फुलांना पाणी घालायची. माझी रोजची सकाळ तिच्या तेजस्वी चेह-याच्या किरणांनी व्हायची. तिला पाहिलं कि फूलहि नव्या तेजीनं खुलायची. पाखरं ही तिच्या भेटीस येत तेव्हा जेव्हा ती अर्धवट भिजलेल्या अंगाने,  ओल्या केसांना टॉवेल गुंडाळून गॅलरीत फुलांना पाणी घालायची. अगदी साधा साज असायचा तिचा,  न्हाऊन आल्यावर तिचा तेज अजून फुलायचा,  नक्षत्र नजर, एक छोटीशी अलगूज उमलावी अशी ओठांची गुलाबी पाकळी,  त्या ओठांच्या भेटीस तरसलेला तो ओठांच्या  कोप-यावरचा तिळ , नितळ पिळदार,  शुभ्र मखमली कंबरेचा बांधा,  वलदार शरीरावर एकही डाग नाही. अस तारूण्य पाहून कोणीही त्या अप्सरेच्या प्रेमात पडेल .तिला पाहिल्याशिवाय माझा दिवस जात नसे काही तरी चुकल्यासारख वाटत असे, दोन वर्षे झाली मला या घरात येवून पण या दोन वर्षांत कधी हिम्मत झाली नाही तिला बोलायची.  सुरवातीला लपून छपून पहायचो तिला.  नवरा मिल्ट्रीत असतो., येतो आधी मधी तिला भेटायला,  सासू-सासरे आहेत,  मुलगा मिल्ट्रीत असला तरी म्हातारपण

कथा

स्थळ-: कॉलेज कॅंटीन पात्रं-: तपस्वी, सायली, अनिल.    ' असाइनमेंट पूर्ण झाले का तुझे ' ...अनिल ' नाही रे अजून गेले काही लेक्चर मिस झाले होते म्हणून राहीले त , ...सायली ' ए सन्नी कॉफी आण ना दोन प्लीज ' ......अनिल मागे वळून कॅंटीनबॉयला ' बरं इतकं काय त्यात ती तुझी डॉल बेबी आहे ना तपस्वी तीच्या कडून घे ना '.....अनिल कॅंटीनचा टेबल वाजवत ' तपस्वी?  तीच नाही आली कित्येक दिवस '....सायली नाराजगीने बोलते ' अरे तीला काय गरज कॉलेज ची , बिनधास्त गर्ल आहे ती , पब-शब , नाईट वेअर पार्टीस , पैसेवाली आहे ती शिवाय बड्या बापाची मुलगी!  ती का असाइनमेंट वगैरे करेल '......अनिल बुक्स चाळताना ' घ्या कॅफी.'.... सन्नी कॉफी ठेवून जातो 'मी देतो नोट्स कर पूर्ण असाइनमेंट!  वर्षे वाया नको घालवू'  ...अनिल बॅग उघडून ' थँक यू रे ' .....सायली नोट्स घेते ' पण तु नाराज का ' ...अनिल सायलीचा हाथ हथात घेतो 'मी नाराज नाही दुखावले आहे ' ...सायली भरलेल्या डोळ्यांतील पाणी पूसताना '' ए वेडाबाई अग रडतेस का!  काय झालं ? तु मलाही