Posts

Showing posts from 2018

गझल

Image
गज़ल 

चारोळी

क्या पता था कि महोब्बत ही हो जायेगी, हमें तो बस तेरा मुस्कुराना अच्छा लगा था.. रिंकी

झोपनगरच्या चौकात

Image
झोपनगरच्या चौकात तुझ्या, इश्काचा सिग्नल हिरवा होतो त्या हिरव्याशा गोड होकाराने , माझ्या झोपनगरीत मी स्वप्न रंगवतो #रिंकी

तु ये ना पुन्हा

तु ये ना पुन्हा... सोबत चालना-या अबोल्या सावलीला बिलगून चालणारी पाऊलवाट होवून तु ये पुन्हा तुझ्या मखमली ओठांचा स्पर्श होताच माझा सावळा रंग खुलतो त्या रंगात न्हाऊन तु ये पुन्हा पावसाच्या हलक्या सरी सोबत मातीच्या गंधात मिसळून गंधाच्या सुगंधात उमजून तु ये पुन्हा गुलमोहरावर धुक्याची रास रचून तो गारवा मोहरतो तसं गारव्याची शाल पांघरून तु ये पुन्हा #रिंकी..

आसवाची कविता

                       काळजाच्या उंबरठ्यावर,                            येवून अडकली ...                         त्याच्या आसवांनी ,                           लिहीलेली कविता...        #रिंकी

प्रभात काल

      त्याला बघून खुलते ,      तिच्या खळीवर लाली ...    जसा उमलावा गुलमोहर ,          रोज प्रभातःकाली... #रिंकी

ऊन

           माझ्या प्रीतीच्या उन्हाला,               तुझ्या सावलीची ओढ ...                    नाजुकशी खळी गाली,                        जशी साखरे हून गोड .. #रिंकी

नज़ाकत

ए दिल जरा नज़ाकत से पेश आना के फिर एक बार जनवरी में मुलाक़ात होगी किया है उसने भी पुरा साल इंतज़ार के फिर ये सर्द यादें दिसंबर के हवालात होगी #रिंकी

गझल

तकल्लुफ के साथ चलते जाता है ख़ुद - वो गुज़रता वक़्त संभालने का सुझाव देता है ठोकर बिछाये थें उन राहों पर मैने सुना साथ चलने वालों को छाले पाँव देता है सिसक कर चलती है जो उन राहों कि फ़िक्र लगाकर नमकीन मरहम वो दिल घाव देता है कुछ रोज़ गीली कर लेतीं हूँ रातों की नींदीया जरासी आनें के उम्मीद पर वक़्त ठहराव देता है #रिंकी

गुलमोहराची सावली

गुलमोहराच्या सावलीला बिलगून , माझ्या गारव्याचा सुंदर होवून तु ये पुन्हा  ... त्या गंधाळलेल्या सुगंधाच्या गारव्याची,     शाल पांघरून तु ये ना पुन्हा ..... #रिंकी

नियतीचा खेळा

   किती रात्र चालावा नियतीचा खेळा    मंदिराच्या बाहेर बसतो देवांचा मेळा कोणी पुजतो दगड कोणी माणसांत शोधिला देवा तुला शोधू कुठे आणि शोधू किती वेळा #रिंकी

उब

आयुष्याच्या गारव्याला तुझ्या प्रेमाच्या शेकोटीने एक अलगूज उब मिळावी त्या शेकोटीच्या उबेलाही आपल्या आयुष्याची सोहबत खुब मिळावी

मुक्त छंद

कधी कधी वाटतं खूप रडावं, उशाशी आधार घेऊन तुझ्या स्वप्नात पडावं, स्वप्न मी पहावं तु रात्र होशील का, अंधारात चांदण्याचा दिवा तु हाथी घेशील का. जागेपणी झोप यावी तु अलगूज निज हो , निजही निजते बघ तु हलका सा अनुवाद हो. स्वप्नातल्या राजकुमारासारखा घे घोडस्वारी, मग मी ही घेईल आकाशी नितांत भरारी. तो संध्याकाळी चा गारवा तु जाताना देवुन गेलास,  हलकी शी हितगूज ती हव्याचा सोबती लेवून गेलास.असाच लोभ तुझ्या येण्याचा राहू दे, काळजाच्या एका कोपर्यात मलाही हक्काने पाहू दे राया मलाही हक्काने पाहू...... #रिंकी......

इश्काचा पिसारा

ह्यो तुझा अल्लड सा साज, माझ्या पिरमाला लाजवीतो तुला बघून येडं काळीज, ढोल इश्काचा वाजवीतो त्या ढोलकिच्या तालावर मन नाचतो काहूरा सखे तुला बघून खुलतो ग माझ्या इश्काचा पिसारा.. ।धृ। रोज सपनात बांधीतो ग, तुझ्या नावाचा मी झूला गंध दरवळतो बहरुन ए माझ्या मोगरीच्या फुला तुझ्या केसाला बिलगून दरवळतो गंध सारा सखे तुला बघून खुलतो ग माझ्या इश्काचा पिसारा ।धृ। माझ्या प्रीतीच्या उन्हाला, तुझ्या सावलीची ओढ नाजुकशी खळी गाली,  जशी साखरे हून गोड तुझ्या ओठांवरच्या गोडीला मी आशिक आवारा सखे तुला बघून खुलतो माझ्या ग माझ्या इश्काचा पिसारा #रिंकी ..

उसान

आई तुझ्या उसानाला का ग लळा लावीला  । धृ । सुकं पडलं शिवार , तापला ह्यो रान सारा जड झालेल्या पाण्याचा आता बाजार लावीला आई तुझ्या उसानाला का ग लळा लावीला  । धृ । कुठं भेटलं ग थोडं, बघ सुटाना ह्यो कोडं माझ्या सावलीला ह्या उन्हाने झळा लावीला आई तुझ्या उसानाला का ग लळा लावीला  । धृ । वंशाच्या दिव्यापायी, माझ्यानशिबी भोगाई तुझ्या पदराला श्रापाचा बघ आंदन लावीला आई तुझ्या उसानाला का ग लळा लावीला  । धृ ।

चारोळी

तु छेड मेहफिल गुंफणांची रच तृप्त शब्दांची जाळी मी लावेल लय शब्दांना..जर तु होशील सूरांच्या बागेचा माळी    

मंजू

स्थळ- पात्रं - मंजू (as wife),   राधिका (as friend), अनंता (as husband of manju) ''hi love hoow are you ., when you come back, तुझं प्रोजेक्ट संपायला किती दिवस आहेत अजून ''.... (मंजू फोन वर विदेशी असलेल्या अनंताला बोलताना ) ''Yes it's complete to progress in next week dear मी येतोय पुढच्या आठवड्यात ''...(अनंता मंजू ला बोलताना ) '' When you come again hear darling''....(.अनंता ची विदेशी सेक्रेटरी अनंता ला बोलते )   '' not aging it's enjoyed life आज तुम कल कोई और फिर कोई और ..एक से मन नही भरता डियर ''  ...(अनंता विदेशी सेक्रेटरी ला बोलताना) '' अनंता तुझं लास्ट विक मेडिकल चेक अप होतं ना , it's your reports! '' ( अनंताचे विदेशी असलेले बॉस अनंता ला) '' are you all right '' ( अनंता चा मित्र ) ''It's not positive I am  hiv positive '' ( अनंता रिपोर्ट वाचताना स्वतःशी मनात बोलतो आणि हताश होतो) '' काही दिवस पब, लेट नाईट पार्टी, अफेर्स बंद करावं लागे

कोडं भाग तिन

तिचं सौंदर्य तो, नाजुकपणा, तिच्यातला निरागस भाव. अंतर दोघांनी ठेवलं होतं खरं पण आकर्षण कधी थांबत नाही.  सहाच महिने झाले होते तिला ड्युटी जॉईन करून.  अगदी काम असेल तरच ति बोलायची. माझ्या सारखे इतरही होते तिचे चाहते पण ! तिला जमत नव्हतं कोणाशीही तोल मोल करायला.  मी तिला हवा तसाच होतो कदाचित म्हणूनच माझ्या आकर्षणाला मुकली असेल.  दोघांचा समंजसपणा , दोघांची विचार करण्याची प्रवृत्ती.  वेगळं अस कांहीच नव्हत . ब-यापैकी साम्य होतं आम्हा दोघांत . म्हणजे अगदी जेवणाची आवड असो वा कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालणे.  इतपत साम्य पाहून हल्ली ऑफिस मध्ये ही दोघांची नावं जोडली जायची.      आजूबाजूला असणा-या स्टाफ ची चर्चा कधी खरी झाली समजलंच नाही.  शेवटी अश्या गोष्टी जास्त दिवस लपत नाही हे खरे.  आधी कलीग मग सोबत प्रोजेक्ट,  मग कामानिमित्त बाहेर जाणं.  ह्या सगळ्यात मी मर्यादा ओलांडत होतो याचा भानच राहिला नाही.  माझं लग्न झालंय हे माहित असुनही मला नवीन स्पर्शाचा अनुभवाची जणू ओढच लागली.  तिचा हि नकार कधी जाणवला नाही.  आणि ह्या कामानिमित्त होणा-या गाठी भेटींना एका अनामिक नात्याची गाठ बसली.  मला हवं तेव्

सफर

सफर..... हाश्श् ...चला खिडकी बाजूची सीट मिळाली,  नाहीतर एवढ्या तिन दिवसांचाप्रवास अडचणीत करावा लागला असता,  मागच्यावेळी ही महिनाभर आधी रिझर्वेशन केलेलं, तरी सुद्धा वरची फ्लॅट सीट मिळाली होती तिन दिवस झोपून काढले होते,  खालच्या सीट वरच्या त्या आजी बाईंनी बाळा बाळा करून चांगलाच राबवून घेतला होता,  मी पण हो आजी हो आजी करत दोन  दिवस नोकर म्हणून राबलो त्यांचा., काय करणार त्याच्या सोबत एक गोड,सुंदर, अप्सरा सारखी दिसणारी मुलगी होती, मग काय माझं कोमल ह्रदय त्या परी साठी तरसला होता ना,  जशी देखणी ती तशीच गोड गळ्याच्या आवाजाची ही होती,  नखरेलू पण होती थोडीशी,  ''...पाणी बॉटल पाणी,  कोलड्रिंक, मैंगो,  माझा बॉटल ,पाणी '' बॉटल पाणी . ' ए पाण्याची बाटली दे एक '..' ये लो मौसी , पच्चिस रूपये ' ...काय?  पच्चिस रूपये?  अरे कितना लुटोगे,  ... ' हम किधर लूट रहा हूँ मौसी आपही लुटवा लेवत हो, ...दुई हज़ार का ऐसी का टिकट कटवा कर आराम से हराम सरकार की ज़ेब भर सकत हो,  और बिस रूपया कि पाणी बॉटल पच्चीस रूपया में नाही खरीद सकते हैं का , ...बरं दे असूदे तु तरी काय करणार,  देशाच

कोडं भाग चार

कॉलेज च्या लास्ट बेंच वर बसायचास तु ...मला सहज पाहता यावं म्हणून,  ऑफ पिरेड मध्ये गाणी म्हणायचास,माझ्या आवडीचे कलर असलेले कपडे घालायचास,  किती छान होते ते दिवस, तुझं वेड्यासारखं पाहणं, मला आवडतं म्हणून ना आवडत्या विषयाच्या तासालाही हजर रहायचास,  आठवतं का तुला एकदा वॅलेंनटाईन डे निमित्त जांभळ्या रंगाच्या कपडे घालायची अट होती,  माझ्या कडे जांभळा रंगाचे कपडे नव्हते हे तुला माहित झालं तेव्हा!  माझ्या साठी जाभळी साडी घेवून,  हॉस्टेल च्या शिपाई काकांना मला द्यायला सांगितलं होतंस,  तेही रात्रीच्या अंधारात आला होतास , दुस-या दिवशी मी ती साडी नेसून आले तेव्हा कॉलेज कॅंटीनमध्ये तु माझ्यासाठी गुलाबाच्या फुलांचा गुच्छा आणि चॉकलेट चा केक आणला होतास, हा तुझा प्रपोज करण्याचा अंदाज मला खूप आवडला होता,  ते फिल्मी स्टाईल मध्ये गुडघ्यावर बसून, हातात फुलांचा गुच्छ घेवून तु मला प्रपोज केलं आणि मी कसलाही विचार न करता तु हो म्हणाले होते.          अगदी दोन महिन्यांनी लगेच आपन लग्न केले,  किती छान चाललं होतं सगळं ,मी तुझी लकी चॅम्प होते अस तुच म्हणाला होतास,  लग्न नंतर तुला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली, प्रमोश

अरुंधती

सकाळ च्या पहिल्या किरणांसोबत जशी आतूरलेली पाखरं बिलगून पुन्हा नव्या उमेदीने आकाशी झेप घ्यायची  अगदी तसचं व्हायचं माझं जेव्हा समोरच्या गॅलरीत ती फुलांना पाणी घालायची. माझी रोजची सकाळ तिच्या तेजस्वी चेह-याच्या किरणांनी व्हायची. तिला पाहिलं कि फूलहि नव्या तेजीनं खुलायची. पाखरं ही तिच्या भेटीस येत तेव्हा जेव्हा ती अर्धवट भिजलेल्या अंगाने,  ओल्या केसांना टॉवेल गुंडाळून गॅलरीत फुलांना पाणी घालायची. अगदी साधा साज असायचा तिचा,  न्हाऊन आल्यावर तिचा तेज अजून फुलायचा,  नक्षत्र नजर, एक छोटीशी अलगूज उमलावी अशी ओठांची गुलाबी पाकळी,  त्या ओठांच्या भेटीस तरसलेला तो ओठांच्या  कोप-यावरचा तिळ , नितळ पिळदार,  शुभ्र मखमली कंबरेचा बांधा,  वलदार शरीरावर एकही डाग नाही. अस तारूण्य पाहून कोणीही त्या अप्सरेच्या प्रेमात पडेल .तिला पाहिल्याशिवाय माझा दिवस जात नसे काही तरी चुकल्यासारख वाटत असे, दोन वर्षे झाली मला या घरात येवून पण या दोन वर्षांत कधी हिम्मत झाली नाही तिला बोलायची.  सुरवातीला लपून छपून पहायचो तिला.  नवरा मिल्ट्रीत असतो., येतो आधी मधी तिला भेटायला,  सासू-सासरे आहेत,  मुलगा मिल्ट्रीत असला तरी म्हातारपण

कथा

स्थळ-: कॉलेज कॅंटीन पात्रं-: तपस्वी, सायली, अनिल.    ' असाइनमेंट पूर्ण झाले का तुझे ' ...अनिल ' नाही रे अजून गेले काही लेक्चर मिस झाले होते म्हणून राहीले त , ...सायली ' ए सन्नी कॉफी आण ना दोन प्लीज ' ......अनिल मागे वळून कॅंटीनबॉयला ' बरं इतकं काय त्यात ती तुझी डॉल बेबी आहे ना तपस्वी तीच्या कडून घे ना '.....अनिल कॅंटीनचा टेबल वाजवत ' तपस्वी?  तीच नाही आली कित्येक दिवस '....सायली नाराजगीने बोलते ' अरे तीला काय गरज कॉलेज ची , बिनधास्त गर्ल आहे ती , पब-शब , नाईट वेअर पार्टीस , पैसेवाली आहे ती शिवाय बड्या बापाची मुलगी!  ती का असाइनमेंट वगैरे करेल '......अनिल बुक्स चाळताना ' घ्या कॅफी.'.... सन्नी कॉफी ठेवून जातो 'मी देतो नोट्स कर पूर्ण असाइनमेंट!  वर्षे वाया नको घालवू'  ...अनिल बॅग उघडून ' थँक यू रे ' .....सायली नोट्स घेते ' पण तु नाराज का ' ...अनिल सायलीचा हाथ हथात घेतो 'मी नाराज नाही दुखावले आहे ' ...सायली भरलेल्या डोळ्यांतील पाणी पूसताना '' ए वेडाबाई अग रडतेस का!  काय झालं ? तु मलाही

नव्याने जगण्यासाठी उमेद 1

त्या दिवशी तो एकटा नव्हता. भेटायचं ठरलं होतं तर एकट यावं लागेल अशी अट घालणे ही त्याची जिद्द.मग मी ही माझा ईगो घेवून चालणार! मी तरी का एकट यावं मग .तु चुकलं की चुक दाखवून देत होतास ना मग तु केलेली चुक मुळात चुकच नसते . अस मी का ग्राह्य धरायचं. कुठेतरी कधी तरी असा वागशील हे मी बाधित धरलं नव्हतं. असो पण आता मात्र या सगळ्यांच्या तुलनेत मी एक्झिस्टच नाही करत ,याचा मला अभिमान आहे. तस म्हणण्यापेक्षा मी माझ्या स्वाभिमानाला नव्याने  भेट दिली अस ग्रहित धरायला हरकत नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर संधी शोधून मला पर्सनलि शब्दांची जी काही भेट तु दिली होती ती मी आनखीण सहन करू शकत नाही आणि मला आवडनारही नव्हत.लपून छपून बोलनं, काहीतरी नवीन काही तरी वेगळं घेवून येणं,न सांगता खर्च करणं, लेट नाईट बाहेर राहन या सगळ्यांच्या मला राग नव्हता पण चिड चिड होत होती.तु स्वतःला  माझ्या प्रमाणे वागवण्याचा प्रयत्न करत होता आणि मला तु जसा आहेस तसाच हवा होतास.कसं समजत नाही तुला आयुष्यातले सगळे  गणित सहज सुटत नसतात.काही गणित सोडवावी तितकीच किचकट होत जातात. गुदमरून जगणं याला आयुष्य म्हनत नाहीत.आणि हे कळायला तुला खुपच उशी

नव्याने जगण्यासाठी उमेद 2

                 आयुष्यात संधी उपलब्ध करून देणारे क्षण भरपुर असतात पण त्या मिळालेल्या संधीचे सोने करणे हे खरंतर स्वताःच्या अस्तित्वाला एक चॅलेंज असतं. आणि मी स्वतंत्रपणे जगणारी मद-मस्त आयुष्याची डोर ओढणारी स्वच्छंदी नार झाले होते. खरंतर तुझ्यासोबत राहून स्वतःसाठी स्वार्थ कसा निवडायचा हे खुप छान शिकले होते. नशेत बेभान होऊन जसा तु वेडावाकडा बागडायचासना तेव्हा तुझ्या वागण्याचा त्रास मी स्वतः करुण घेतला  .पण बंधन बाधलेलं होतं ना तेव्हा .तुझ्या वागण्याचा त्रास मनामध्ये विस्तवातुन काढलेल्या सळीसारखा बोचत असायचा. कै एकवेळा मन मोकळं करायचा प्रयत्न केला पण!.हा पण नेमकं आडवा यायचा. कदाचित तु बांधिल ठेवलं होतस म्हणून.          ' ऋणानुबंध जोडले गेलेच नाही. म्हणून तु तुझा राहीला आणि मी माझीही होवु शकले नाही'.                  आज अचानक भुतकाळ असा समोर येवून वर्तमानकाची चापट देवून जाईल ही कल्पना मात्र ही मी करू शकले नव्हते. हा कॉफीचा एक कप माझं विसरलं गेलेलं भुतकाळ तो एखाद्या वादळाप्रमाने आला आणि आवर्जून आठवणींचा पसारा मांडून बसला. त्यावेळी तु केलेला पसारा मला एकटीला आवरावा लागत होता. आत्ता

दोष

           दोष नेमका कोणाचा......?.                डाग दिसतात चेहऱ्यावरचे म्हणून तीनं स्कार्फ गुंडाळला आणि दळण दळणयासाठी गिरणीच्या दिशेने वाट निवडली. घराला लाँक लावला आणि दळणाचा डबा कमरेवर ठेवणार तोच शेजारच्या काकूंनी आवाज दिला... '"अग अश्विनी किती सहन करनार आहेस अजून ,जा आईच्या घरी निदान दोन वेळेच जेवण तरी मिळेल तिथे,इथं या नराधमाच्या तावडीतून सुटशील तरी एकदाची.'" पण ती चेहर्यावरचा स्कार्फ सांभाळत डबा उचलून निघाली . घरापासून काही अंतरावर गिरणी होती.तीला पाहून गिरणीवाला पण थबकला. गेल्या ६ महिन्यात त्यालाही सवयच झाली होती हिला या अवस्थेत पहायची. लई थाटामाटात लग्न करून आणलं होत अनिलनं तिला. आख्खिचाळ गेलती लग्नाला.             स्वर्गातून जोडा जमिनीवर उतरला होता जजणू. काय सुंदर दिसत होती आश्विनी आप्सरा पण कमी सुंदर दिसते .पहिल्या दोन महिन्यात काही कमी नव्हती गोडी संसारात पण जेव्हा पासून नवीन घरात प्रवेश केला तेव्हा पासून ती अप्सरा मोलकरीण दिसून येते. गिरणीच्या मागे भाड्याने राहत होता अनिल आणि त्याची बहिण तनुजा . अश्विनीलाही तनुजानेच पसंत केले होते. अनिलच लग्न लावून तनुज

वक्त

वजह कि तलाश ना कर तू राह-ए-सफर चलता जा सोहबत कि परवा ना कर तू वक्त-ए-जिंदगी ढलता जा

धागा

अंतराच्या धाग्याला चिरुन, हळव्या पाऊल वाट्यावरून, विरहाच्या विरंगुळावरून, हरवलेल्या मौनेच्या भाषेवरून, कधीकधी तो..... सांजवेळी विरहातून होणार्या आतूरत्या भेटीवरून , त्या भेटीतल्या सहवासात उमजनार्या मिठीवरून , नजरेनं नजरेच्या स्पर्शाला बिलगून होणार्या हर्षावरून , मनाच्या गाभार्यातून ओठांच्या कोपर्यापर्यंत येणारा हुंदका ........

नाकबूल मी

नाकबूल मी ? बाबा बाबा देता हाक् माझा आवाज रे बसला , मुलगी मी तुझीच, मग का रे असा तू माझ्यावं रुसला. ओढ होती तुजपाशी प्रेमाची, लाडाचे होते आस , अंश होते तुझेच मी, तरी तुला वंश का वाटे खास. प्रेमापोटी आतुरले मनं, हेलावून गेला तूझा आभास , मुलगी मी तुझीच, तू नाकारले मज हाच नं तूझा अट्टाहास . दोन शब्दांच हक्कच प्रेम ,मी मागीतल नाही तूजला, असे -कसे लोटले तू नाते, का नाकारलस मजला. कधीतरी घेऊन जवळी ,तू मायेची देशील थाप , पाणावले डोळे पुसून घेतले, कारण तूच माझा बाप . एकांती कधी शोधता शोधता हरवते माझे अस्तित्व , गहिवरून येता क्षणते ओले, वंशांची भुक हेची का महत्व . हसून जन्म घेतला मी ,तूला स्त्रीलिंगी नाही पटले , बापाच्या प्रेमाला आतुरला काळीज, मी नर म्हणून नटले . बाबाबाबा म्हणुन तूजला, आठवणींत आश्रृही बरसले , दोन शब्द प्रेमाचे ऐकायला ,माझे कान आयुष्यभर तरसले . भरलेल्या डोळ्यांतील जखमी पाणी सांग मी कसे आवरू , अबोल भावनांचा उद्रेक होई,सांग मी त्यांना कसे सावरू. #रिंकी

पुन्हा एकदा

साक्ष होईल वारा, त्या बेभान वादळीचा घेवुन सरींची सोबत बरस तु ,पुन्हा एकदा. काहुरलेल्या मनात होईल, जेव्हा चाहुल प्रेमाची तु निसंकोच व्यक्त हो शब्दांत ,पुन्हा एकदा . नव्या पहाटे नवे सोबती, रवी ही येई मग भेटीला घे भरारी होवुनी सूर्याची किरणं तु, पुन्हा एकदा. रिंकी कुलकर्णी....  (special for someone)

रंग बेरंगी चितेचा

......... रंग बेरंगी चितेचा...                       खरच आकाश निळ्या शाई ने भिजलेला असतो जेव्हा तो उन्हाच्या झळ्याने बदडलेला असतो ..कधी कधी ते ढगं जळुन काळी ही होतात बरंका.. आणि काळी झाली म्हणुन ती रडताही... कधी थोडी तर कधी वेगाने.. कधी कोणाच्या दुःखात रडतात तर कधी कोणाच्या सुखात रडतात.. कधी दुस-यांना रडवतात तर कधी कोणाचे रडु् लपवतातही....ढगं रडली ना की मग बागेत व इतरत्र रंगबिरंगी फुलं उमलतात मग चहुकडे हिरवळ दाटु लागते... वसंत पंचमी बहरते... फुलांवर ना ना प्रकारचे फुलपाखरु डोलु लागतात... नवी- पालवी फुटलेलं हिरवं झाडही मग वा-याच्या लहरीत नाचु लागतात... रम्य परीसराने बहलेलं हे वातावरण नव-नव्या प्रेमाची गाणीं म्हणतात ....दरी -खो-यातुन शुभ्र पांढ-या रंगाचे पाणी वेगात वाहु लागतात... झ-यातुन वाहताना त्या पाण्याला ही खळ-खळुन गीत म्हणावसं वाटतं आणि तो त्या गीताच्या तालावर नाचतो सुद्धा... मग आकाशातुन रडनारे ढगं जमीनीला भेटन्यासाठी आतुर होतात                    मग त्यातले काही अश्रु हवेत तरंगतात आणि त्या इंद्रधनुष्याच्या स्वाधीन होतात... मग सात रंगांचे लहर तयार होते तांबडा,नारंगी,पिवळा,हिरवा,न