रंग बेरंगी चितेचा

......... रंग बेरंगी चितेचा...
                      खरच आकाश निळ्या शाई ने भिजलेला असतो जेव्हा तो उन्हाच्या झळ्याने बदडलेला असतो ..कधी कधी ते ढगं जळुन काळी ही होतात बरंका.. आणि काळी झाली म्हणुन ती रडताही... कधी थोडी तर कधी वेगाने.. कधी कोणाच्या दुःखात रडतात तर कधी कोणाच्या सुखात रडतात.. कधी दुस-यांना रडवतात तर कधी कोणाचे रडु् लपवतातही....ढगं रडली ना की मग बागेत व इतरत्र रंगबिरंगी फुलं उमलतात मग चहुकडे हिरवळ दाटु लागते... वसंत पंचमी बहरते... फुलांवर ना ना प्रकारचे फुलपाखरु डोलु लागतात... नवी- पालवी फुटलेलं हिरवं झाडही मग वा-याच्या लहरीत नाचु लागतात... रम्य परीसराने बहलेलं हे वातावरण नव-नव्या प्रेमाची गाणीं म्हणतात ....दरी -खो-यातुन शुभ्र पांढ-या रंगाचे पाणी वेगात वाहु लागतात... झ-यातुन वाहताना त्या पाण्याला ही खळ-खळुन गीत म्हणावसं वाटतं आणि तो त्या गीताच्या तालावर नाचतो सुद्धा... मग आकाशातुन रडनारे ढगं जमीनीला भेटन्यासाठी आतुर होतात
                   मग त्यातले काही अश्रु हवेत तरंगतात आणि त्या इंद्रधनुष्याच्या स्वाधीन होतात... मग सात रंगांचे लहर तयार होते तांबडा,नारंगी,पिवळा,हिरवा,निळा,पांढरा आणि जांभळा.... तसे भरपूर रंग आहेत ग आपल्या आवती भवती फक्त ती जानवावी लागतात.... निसर्गात रंगांची कमी नाही.... मग ती माणसांत असो देवात असो वा... विचारात असो.... आपल्याला जो रंग आवडतो ना तो मनातुन निर्माण करायचा बस्....मग काय आपलीच दुनियां नी राज्यही आपलेच.... तुला सांगतो.........
                    तु नेहमी बोलायची सुरवात अशीच कारायचा... ''तुला सांगतो''.. या दोन शब्दातच मी असायचे म्हणुन कदाचित् ...जगातले सर्व रंग तु दाखवले अगदी तसेच आहेत पण....तुझाही एक आगळा- वेगळा रंग मी ही अनुभवला.. मला कल्पनाही नव्हती की तु असं काही करशील... गेला आठवडा तु मला तुझ्यापासुन दुर ठेवलस... मला फोनही नाही केलास... मी तुझ्या बद्दल बाबांनाही विचारलं तर तेही काहीतरी वेगळच कारण सांगायचे... ताईला विचारल तर ती म्हणायची की तु गावी गेलाय... मी तिकडेही कॉल केला पण कोणीही काही सरळ उत्तर देतच नव्हते...चार दिवसां आधी माझं ऑपरेशन होतं तुला माहीत होतं ना.. तुच घेतली होतीस ना अपॉईनमेंट आणि तुच नाही आलास... ऑपरेशन झाल्यावर मला डॉक्टर काकांनी विचारले तुझे नेत्र मिळाल्यावर आधी कोणाला पहायचे गं राणी.... मी नाराज होते पण आशेच्या किरनांना मनात घेवुन डॉक्टर काकांना तुझंच नाव सांगीतलं... बाबा ही होते त्यावेळेस तीथे आणि त्यानींच मला वचन दिले की मी आधी तुलाच पाहीन... कारन आजवर मी तुझ्या सोबत राहुन तु दाखवलेली दुनियां पाहीली.....
                  माझ्या सारख्या नेत्रहीन मुलीशी कोन वेडा प्रेम करनार... असा विचार मी करायचे आणि बाबाही... तु जेव्हा ताईच्या लग्नात मला प्रपोज केला होता तेव्हाच बाबांनी मला तुझ्या स्वाधीन केलं होतं आठवतं तुला... आज माझी डोळ्यावरची पट्टी उतरनार आणि मी तुला पाहनार... तुलाच का तर जन्म दात्या आई-बाबांना, ताईला.... तु दाखवलेल्या सुंदर जगाला पाहनार......बाबांनी त्यांच वचन पुर्ण केलं....माझी पहीली नजर तुला पाहावी... तुला पहायची इतकी हुरहुरता लागली होतीना... सारखी विचारत होते बाबांना तुझ्याबद्दल..... ते फक्त हो येईल ग राणी तो... असेच म्हनत होते.... जरा चिडले मी त्यांच्यावर पण.......
                        पट्टी उघडली तेव्हा हसु की रडु काही कळेनाच.... तु कित्ती सुंदर आहेस.. तु किती निरागस आहेस.... तु किती ......काहीच कळेना तुला भांडु की स्वताशीच रागवु.... या गोंधळात मी सगळी रंगही विसरली होती.. पुन्हा काळोखाला आलिंगन द्यावसं वाटत होतं... खाद्यांवर बाबांनी हात ठेवला नी म्हनाले...-'' तो जो समोर झोपला आहे ना तोच तुझा निशांत आहे '!.....आणि ज्या डोळ्यांनी तु त्याला पाहतीयेस ना बाळ हे डोळेही त्याचेच आहेत.....

                     हा एक वेगळाच रंग होता तु दाखवलेली दुनियां मी तुझ्याच नजरेने पाहीलीे... तुझी चिता मी तुझ्याच डोळ्यांनी माझ्या नजरेत पाहीली.......
                       ' तुझविन रे सख्या जगने माझे दुभंगले....
                           रंग तुझ्या प्रेमाचे, मी त्यातच होते रंगले '......

                                                                                        रिंकी कुलकर्णी....

Comments

Popular posts from this blog