कोरं पोस्ट कार्ड

' कोरं 'पोस्ट कार्ड ''

आज जेवनाचा मेनु इन्डियन असला तरी आईच्या जेवनाची सर काय येनार ह्या हॉटेलच्या जेवनाला.. आलो तेव्हा खुप खुश होतो. परदेशी राहायला मिळनार,तिकडची ओळख मिळनार, सगळ काही वेगळ असेल ! कुठे मी अश्या विचारात होतो आणि कुठे रियालीटी सारं काही स्वप्न मात्र होत... वास्तविक जीवन जगनं नी निभावन यातल अंतर मायदेशुन परदेशी जास्त उमजल.... कामाचा व्याप किती यांची टारगेट किती जॉब म्हनजे only धंदा असतो या लोकांनसाठी.. नात्यात व्यवहार करनारे हे.. साधी मानसाची किंमत नसते यांना आपल्या कामाचं टारगेट कसं पुर्ण करुन घ्यायच हे जमत मात्र नक्की.. शंकाच नाहीं....
घर-दार सोडुन आलो ,पुन्हा न जान्यासाठी पन आत्ता फक्त दिवस मोजतोय कधी यांचा बॉन्ड संपतो आणि माझी सुटका होते या जाळ्यातुन.... आई रोज फोन करत होती.!कितीतरी मिस्डकॉल ...ईतका हताश कधी न्हवतो एक फोन नाही करता येत मला... ती आतुरतेने वाट बघत असेल माझ्याकॉलची पन मी एक फोन नाही करु शकत ती ला... त्यात वेळही साथ देत नाही 5 तासाचा अंतर आमच्या मध्ये... ईकडे उन असेल तेव्हा तिकडे संध्याकाळची सावली... मला वेळ असला की ती निजत असेल हा विचार मी करायचो.. आणि असाच काहीसा विचार ती ही करत असेल...
काल एकंदरीत नेहमी प्रमाने मिस्डकॉल होते तीचे... पन ही बोर्ड मिटींग ही खुप म्हत्वाची होती... आज माझं प्रोजेक्ट पूर्ण झाल होत जर का या मिटींग मध्ये माझ प्रोजेक्ट लौंच  झाल तर मी लवकरात लवकर मायदेशी परतलो असतो कायमचा...... मिटींग मध्ये एक वेगळीच हुरहुर होती मनात.. आज वेगळीच भीति वाटु लागली होती.... जनु काहीतरी चुकतय अस.... 7 मिस्डकॉल होते आईचे, ताईनेही 3 मिस्डकॉल केले... मला उत्तर देता नाही आलं.... 7 वाजता मिटींग संपली... Congratulations चे पाउस पडले माझ प्रोजेक्ट अप्रुव्ह झालं... मग संध्याकाळी लगेच बोर्ड वॉफ स्टाफ ची पार्टी होती..... म्हनुन घरी रिकॉल नाही करता आला.... पार्टी चालु असताना विशालने (मित्र आणि रुम पार्टनर) ऐअर इंडिया चे दोन तिकीट आणि सुट्टीच लेटर हातात दिलं... गळ्यात पडुन माझ आभीनंदन केल तर खर पन आज तो वेगळाच वागला माझ्याशी... त्याच्या आजच्या मिठीत वेगळीच उब जानवली.. त्याने माझ्या नकळत पैकिंग केली होती ........
आमची निघायची वेळ झालीच होती ..''इतका गप्प का आहेस तु '' विचारल मी तर हातात हाथ घेवुन बसला होता... रात्रि 2 ची होती फ्लाइट...... सगळी अरेंजमेंट त्यानेच केली होती... काय झालय काही कळत न्हवते.... तसा मी खुप वेगळ्या विचारात होतो ''चला आता आई नी बाबाला सरप्राइज देतो... त्यांची मान कशी उंच होते हे पाहन्याच मला सौभाग्य मिळेल ! त्यांनाही घेवुन येतो ईकडे, म्हनतील तरी पोरानं नाव कमावलं ''....
खुप एक्साईटेड होतो ...गगनही छोटा झाला होता आज माझ्या यशापुढे.... विमानातल्या विंडोज़ सीट वर बसुन अगदी मावनार नाहीत इतकी स्वप्न पाहीली...
भारताताच्या विमानतळावर पाय ठेवताच एक ओढ लागली मनाला... समोर दाजी दिसले... मला पिकअप करायला आलेते ''आई कुठे ती का नाही आली... बरं ताई ही नाही आली... कसे आहात दाज........''
''चल घरी चल लवकर'' म्हनत त्यांनी हातातुन बँग घेतली... मी वेड्यासारखा प्रश्न विचारतोय पन कोनीही उत्तर देत नाही..'' अरे काय चाललय हे.. विशाल तुतरी सांग काय तरी.. .. असा अचानक मला काही न सांगता घेवुन आलास आणि दाजीही काही बोलत नाही.. ''ओ दाजी काय झालय आहो सांगा तरी मला राग येतोय आता तुम्ही बोला ना माझ्याशी! ''...... टैक्सी ड्राइवर सुदधा माझा संताप बघुन घाबरला.... 'फास्ट चल रे भैया '' म्हनत दाजी नी माझ्या खांद्यावर हाथ ठेवला... मी शांत झालो पन कावरा-बावरा झालो हे नक्की.. दारावर गर्दी होती खुप लोकं जमली होती... मलापाहुन कुजबुजु लागली...गेट पासुन  हॉलच्या जवळ जाताना एक रडन्याचा आक्रोश ऐकु  आला.... मी उंबरठ्यावरच कोसळलो.... 'आ..ई' .....घाबरलेल्या अवस्थेत.. घामाने भीजलेल्या खांद्यावर ताईने अाधाराचा हाथ ठेवला मला सावरत ताई आणि विशाल बेडरुम मध्ये घेवुन आले.....मला पाहताच आईने दुःखाने भरलेला हंबरडा माझ्याखाद्यावर फोडला..... तीला घट् मिठी मारुन मी नजर बेड वर टाकली.......  पांढरी चादर टाकुन बाबांना झोपवलेल... '' बाबां......नाही राहीले'' म्हनत ताईनेही मिठी मारली.... त्या दोघींना मिठी मारुन मी माझ्या सह तिथे हजर असलेल्या प्रतेयकाने आमच्या त्या दुःखात सामिल झाले... ''खुप फोन केलेरे तुला.. पन तु एकही फोन उचलला नाही ''.... खुप रडलो ''आई मला माफ कर ग मी चुकलो गं आई... बाबा का गेलात हो मला पोरकं करुन बाबा उठाना चला मी तुम्हाला माझ्याबरोबर न्यायला आलोय ओ बाबा.. चला ना उठा ना बाबा.....!....................................................महीना उलटला आईने सावरलं होत स्वताला कदाचित् मी सोबत होतो म्हनुन...

''सम्या बांबाच्या उशीशी मला हे पोस्ट कार्ड मिळालं ...कोरं आहे कदाचित् या को-या भावना तुला कळतील ''..अस म्हनत मायेची हाथ डोक्यावर फिरवुन ती आत गेली.. आणि मी वाचत बसलो हे कोरं.. ''पोस्ट कार्ड ''

रिंकी कुलकर्णी...........

Comments

Popular posts from this blog