अनोळखी मैत्री

अनोळखी  मैत्री....... आणि आठवण..

ऩेहमी तिला छळनारी ही गोष्ट!का कोणास ठाऊक आठवली की जनु पुरच वहायचा डोळ्यातुन... जनु काय त्या एकांती कोणी समोरही आलं तरी हिला आणि हिच्या अश्रुनां सांभाळण कठिन होनार होतं ..
अशावेळी तिला ''काय ग काय झालं आज ईतकी का गप्प तु '' असंही विचारनं चुकीचंच वाटेल त्याला ..

आणि पाहीलं तर हे चुकीचंच अशनार 'तिच्या द्रुष्टीकोनातुन ' कारण ह्या गोष्टीची भर कोणि तिला भरुन देनारं न्हव्तच 'तिच्या आयुष्यत... असं तिला वाटत जेनेकरुन एक व्यक्ति होता तिच्या आयुष्यत ''जो ही उरलेली जागा पुर्नपने नाही पन थोडीशी का व्हाईना भरतच होता...

''पन '' हा शब्द कुठेतरी मनात घर करुन बसलेला होता हे मात्र खरयं

.. ही गोष्ट आजच का तिला ईतकी बैचेन करते ?? हा प्रश्न ''जेव्हा तिचा कॉल आला आणि हुंदक्या आवाजात ति म्हनाली ''मला बोलायच आहे तुझ्याशी '' तेव्हाच मी समजुन घ्यायच होतं... कि हिचा हुंदका मलाही तितकाच बेचैन करनारा होता.... निघाले तर होते मन घट् करुन तिला भेटायला, स्वतालाही समजावत होते की तिला या क्षणी माझी गरज आहे ,कारन कळलेच नाही की अशावेळेस हिला मीच का आठवते may be माझ्याशी बोलुन ती निवांत श्वास घेत असेल म्हनुन...? जितका वेळ तिच्या कडे लवकर पोहोचन्याचा होता तीतकाच वेळ माझ्याही मनात प्रश्नांनानच्या पाय-या उभ्या होत होत्या...
पोहचले एकदाची ''जिना चढुनच वर जावे '' म्हनजे तिला सांभाळुन घेन्याइतपतचा मोठ्ठा श्वास मलाही घेता यावा....

दारावरची बेल वाजवली आणि लांब हुंदका मी ही घेतला, तिने दार उघडलं मात्र तिच्या पान्याने भरलेले डोळे, विस्कटलेले कपाळावरचे केस, आणि रडुन रडुन सुजलेले डोळ्याखालची वर्तुळे.... ही तिची आव्सथा पाहुन मी दारातच हताशा झाले.. दोन मिनटं मी ही विसरले की मी ''तिला ''  सावरायला आले असं हताश झाले तर मग तिचा आपल्यावरचा विश्वास नक्किच डोलेल...
'काय झालं '' विचारताच ती उंबरेवरच माझ्या गळ्यात पडली ,तिला सावरुन एका हाताने दार लोटत हॉल मधे घेवुन आले... तिचं रडनं काही केल्या थांबेना, तिला तशीच सोडुन पानी आनायला धावले...

'घे पानी घे, शांत हो ग अजुन किती रडनार आहेस बस झालं '' असे म्हनत तिचे डोळे पुसले नि पुन्हा विचारलं 'सांग काय झालं '
डोळेपुसतच तिने हातातला पान्याचा ग्लास टेबलवर ठेवला अणि लांब श्वास घेत म्हनाली ''त्यांनी साधा मायेचा हात पन कधी डोक्यावरुन फिरवला नाही गं '' ''त्यांना कधिच जानिव  नाही झाली का?  की मी त्यांचाच हाडामासाचा एक तुकडा आहे'' '' त्यांनी कधी एक प्रेमाचा घासही भरवला नसेल मला '' कधी एक रुमालही घेवुन दिला नाही '' 'आजवर मी ही आपेक्शा नाही केली त्यांनच्याकडुन पन माझं अस्तित्वच त्यांनच्यामुळे आहे ,हे का नाही समजले त्यानां'' एवढं बोलुन ती गप्प झाली...
हे एवढं ऐकुन एक लक्षात आलेच होते की ती तिच्या '' बाबांनविशयी '' बोलत होती... तिला तिच्या बाबांचं प्रेम कधिच मिळालं नह्वत हे तिनेच मला सुरवातीच्या एक -दोन भेटीत सांगीतले होते... तशी आमची काही खास मैत्री न्हवती... सहच फेसबुक वर ओळख झाली आणि friends म्हनुन बोलत होतो.. हळुहळु संवादात समजले की ती घरापासुन अवघ्या विस मिनीटंच्या अंतरावर राहते... मग काय आत्तापर्यतच्यां भेटीत ही आमची तिसरी भेट होती... पन वेळ मिळाला की आम्ही एकमेकींना मेसेज करत असायचो... ति ऑनलाइन आलि की माझे मेसेज वाचुन त्यावर रिप्लाय करायची नि मग जेव्हा मला वेळ मिळत होता तेव्हा मी रिप्लाय करायची... म्हनजे बंधन नह्वतं की दोघींनीही ऑनलाइन असायलाच पाहीजे.. ति मला माझ्यासारखीच वाटली म्हनुन मीही कधी तीला ignore नाही केलं.. पन तिनेही कधी force नाही केलं की तु माझ्याशी बोललीच पाहीजे......
एकंदरीत तिचं सगळं बोलनं ऐकुन घेतलं...बोलता बोलता ती शांत झाली.. जनु खुपवर्षापासुन मनात दडवलेलं दुःख तिने बाहेर काढुन टाकुनच दिल्यासारखं... होतं हे वागनं तिचं...
मग मी तिच्या खांद्यावर हाथ फिरवलं नि तिला किचन मध्ये घेवुन आले 'जा जरा पानी मार चेहर-यावर (म्हनजे चेहरा धुवुन घे) ''
आणि समोरच ठेवलेल्या पातेल्यातलं दुध ग्यास वर ठेवुन दोघींसाठी कॉफी बनवली... तिचं आवरुन झालेलंच होतं तेवढ्यात... तिला ततो कॉफीचा कप दीला आणि 'चल जरा ग्यालरीत ये मोकळ्या हवेत बरे वाटेल ये ' असं म्हनत दोघी ही ग्यालरीतल्या बाकाशी आधार घेत उभे राहीलो...
हस-या च्ह-याने तिच्याकडे पाहत मी बोलायला सुरवात केली 'अग असं नाणयाची एकच बाजु तु मनात रुजवुन घेतलीस मनामधे, तर या गोष्टीचा त्रास तुला आयुष्य भर होनारना ''' 'मग मी काय करु 'बाबांची कमी मला नेहमीच खलते, सलते मला ही बाब की बाबा असुनही, त्यानंचं प्रेम मला मिळलंनाही! त्याचयां सहवासात राहुनही मी ' बाबा' अशी हाकही नाही देवु शकले '' तिला मधेच थांबवत....
''अगं हो तुझं बरोबर आहे ''..... पन त्यानंचीही बाजु घेकी समजुन ',तुम्ही पाच मानसं! एका छोट्याशा खोलित राहत होतात, त्यात वाढती महागाई होतीच जेनेकरुन तुझी आईही घराला जरासा हाथभार लागावा म्हनुन कामासाठी तुम्हा तिघांभावंडांना  सोढुन घराबाहेर पडली '' आणि शिक्षान होतं तुझ्याभावचं तेही English medium ला... तुम्ही दोघी मराठीतुन शिकलात पन तुच सांग कोन हुशार निघालं तुम्च्यासर्वात... तुचना.. ही बाब तुझ्या वडीलांनच्या लक्शात आलि असेल कदाचित् म्हनुन तुला त्यानीं ग्रुहीत धरलं नसेल ग' ही गोष्ट तुच सांगीतली होतास ना मला... बहिन नेहमीच तुझ्यापेक्शा कमीच होती आभ्यासातही आणि समंजस पनातही.... हेही तुच सांगीतलंस''
'मग तुच गेस कर की लहानवयातच तुझ्या बाबांच्या हाताला आलिहोतीस.., कदाचित् म्हनुन त्यानीं तुझ्याकडे कमी लक्श दिलं असेल होकी नाही... इतकच नाहीतर तु लहान वयात छोटी छोटी कामं करुन त्यानां पैशासाठीही मदत केलीच होती..., तुझ्यापहील्या पगारातुन तुला बाबांनी एक घड्याळही घेुवुन दिले होते, आठवतयं ना, 'मग ते कुठेतरी तुझा विचार करतच होते खरयं ना... 'फरक एवढाच होता की त्यानीं तुझ्यावरची माया दर्शवली नाही कधी... ''ते त्यानच्या बाजुने बरोबर होते ग...त्यानीं कधी त्यानांचा विचार केला का.. 'कधी स्वतावर पैसै खरचं केले का... 'की कसल्या व्यसनापायी तुमच्याकडे दुर्लक्श केलं.... '
तुही एका मुलाची आई आहेस आत्ता जगाचं, बाहेरच वातावरण पाहतेय ना.. 'भागतं का तुमचं व्यवस्थित तुच सांग..... 'कितीतरी वेळा तुम्हालाही मन मारुन जगावं लागत अशनारच  की... 'मनात आलं ते घेता आलयं का कधी न विचार करता मग तु तुझ्या बाबांची बाजु समजुन घ्यायला हवी निदान आत्तातरी...... '
तिने मान हलवली.. कदाचित् मला जे सांगायच होत! ते तिला कळलं असावं... तिच्या चेह-यावरचे भाव पाहुन मलाही रिल्याक्स फिल झालं...

म्हनजे तिनं ज्या उद्देश्याने मला बोलावलं होतं एकंदरीत मी त्या तिच्या विश्वासावर खरी उतरले अस ग्रुहीत धरायला काही हरकत नाही....
हा विचार करत तिला समजावुन मी तिचा निरोप घ्यायचा ठरवला... 'पुन्हा वेडाबाई सारखे रडत बसु नको ''...ते नाही बोलत तुझ्यासोबत तर ठिक आहे तु न बोलता त्यानच्या भावना समजुन घेन्याचा प्रयत्न कर... नाहीतर तु नाराज आहेस पाहील्यावर त्यांना त्रास नको... ''शेवटी ते बाबा आहेत तुझे... ' तुझी नाराजगी त्यानच्यापासुन लपनार  नाही..''

'चल मग मी निघते  भेटु पुन्हा... ''
तिला पाठ फिरवुन मी एक सुदंर हास्य स्वतासोबत घेवुन निघाले होते.. एक confidence आला होता..... वेगळिच अनुभूति होती ती.. मी काहीतरी जिंकुन आल्यासारखं वाटत होतं... पंख फुलले होते जसे आत्मविश्वासाचे.....

बाबां असुनही त्यानंच्या प्रेमापासुन वंचित राहने हे माझ्यापेक्शा जास्त
कोनी कसे समजावुन सांगीतले असते  तिला.... कारण  ही खंत मनात कुठेतरी मलाही जानवत होताच....
तिला समजावताना असं वाटलं जसंकी मी स्वाता आरश्यासमोर उभी आहे... स्वाताच्या भुतकाळाशी युद्ध लढुन आले होते.......

पन कमी पना जानवेल हे नक्की........ बाबा या श्बदाशी...

रिंकी कुलकर्णी..........

Comments

Popular posts from this blog