कोडं भाग तिन

तिचं सौंदर्य तो, नाजुकपणा, तिच्यातला निरागस भाव. अंतर दोघांनी ठेवलं होतं खरं पण आकर्षण कधी थांबत नाही.  सहाच महिने झाले होते तिला ड्युटी जॉईन करून.  अगदी काम असेल तरच ति बोलायची. माझ्या सारखे इतरही होते तिचे चाहते पण ! तिला जमत नव्हतं कोणाशीही तोल मोल करायला.  मी तिला हवा तसाच होतो कदाचित म्हणूनच माझ्या आकर्षणाला मुकली असेल.  दोघांचा समंजसपणा , दोघांची विचार करण्याची प्रवृत्ती.  वेगळं अस कांहीच नव्हत . ब-यापैकी साम्य होतं आम्हा दोघांत . म्हणजे अगदी जेवणाची आवड असो वा कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालणे.  इतपत साम्य पाहून हल्ली ऑफिस मध्ये ही दोघांची नावं जोडली जायची. 
    आजूबाजूला असणा-या स्टाफ ची चर्चा कधी खरी झाली समजलंच नाही.  शेवटी अश्या गोष्टी जास्त दिवस लपत नाही हे खरे.  आधी कलीग मग सोबत प्रोजेक्ट,  मग कामानिमित्त बाहेर जाणं.  ह्या सगळ्यात मी मर्यादा ओलांडत होतो याचा भानच राहिला नाही.  माझं लग्न झालंय हे माहित असुनही मला नवीन स्पर्शाचा अनुभवाची जणू ओढच लागली.  तिचा हि नकार कधी जाणवला नाही.  आणि ह्या कामानिमित्त होणा-या गाठी भेटींना एका अनामिक नात्याची गाठ बसली.  मला हवं तेव्हा मी माझ्या परीने तिला सामावुन घेतलं स्वतःमध्ये.  तिचाही कधी नकार नव्हता.  तिनेही या नात्यात स्पर्शांचा नेहमी आवर्जून आनंद घेतला होता. 
    पण मग हळूहळू या स्पर्शात अट्टाहास दिसून आला.  एकंदरीत बघायच तर आता सगळं जुनं झालं होतं.  स्पर्श ही ओळखीचा वाटू लागला होता.  कधीतरी तिचा नकार यायचा तर कधी कधी माझं मन मला कोड्यात टाकत होतं.  पण! नकळत घडलेल्या नात्याला घेवून चालायचं,  आयुष्यात असं ठरवलं होत दोघांनी आणि जी अनामिक वाट बनवली होती एकमेकांच्या सहवासात त्या वाटेवर कधीतरी भेटायचं ठरलं. तरीही हे असं किती दिवस चालवायचं हे एक कोडेच आहे

क्रमशः

#रिंकी

Comments

Popular posts from this blog