कोडं भाग चार

कॉलेज च्या लास्ट बेंच वर बसायचास तु ...मला सहज पाहता यावं म्हणून,  ऑफ पिरेड मध्ये गाणी म्हणायचास,माझ्या आवडीचे कलर असलेले कपडे घालायचास,  किती छान होते ते दिवस, तुझं वेड्यासारखं पाहणं, मला आवडतं म्हणून ना आवडत्या विषयाच्या तासालाही हजर रहायचास,  आठवतं का तुला एकदा वॅलेंनटाईन डे निमित्त जांभळ्या रंगाच्या कपडे घालायची अट होती,  माझ्या कडे जांभळा रंगाचे कपडे नव्हते हे तुला माहित झालं तेव्हा!  माझ्या साठी जाभळी साडी घेवून,  हॉस्टेल च्या शिपाई काकांना मला द्यायला सांगितलं होतंस,  तेही रात्रीच्या अंधारात आला होतास ,
दुस-या दिवशी मी ती साडी नेसून आले तेव्हा कॉलेज कॅंटीनमध्ये तु माझ्यासाठी गुलाबाच्या फुलांचा गुच्छा आणि चॉकलेट चा केक आणला होतास, हा तुझा प्रपोज करण्याचा अंदाज मला खूप आवडला होता,  ते फिल्मी स्टाईल मध्ये गुडघ्यावर बसून, हातात फुलांचा गुच्छ घेवून तु मला प्रपोज केलं आणि मी कसलाही विचार न करता तु हो म्हणाले होते.
         अगदी दोन महिन्यांनी लगेच आपन लग्न केले,  किती छान चाललं होतं सगळं ,मी तुझी लकी चॅम्प होते अस तुच म्हणाला होतास,  लग्न नंतर तुला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली, प्रमोशन ही लवकरच मिळाला होता,  कंपनी कडून मिळालेली गाडी आणि घर,  सगळं इतकं छान होत होतं कि आपल्या घरच्यानी सुद्धा आपलं लग्न एक्सेप्ट केलं होतं, आई बाबांनी आपल्या लग्नाच रिशेप्शन ही खूप मोठं केलं होतं , तुही किती रोमँटीक होतास,  सगळ्यांसमोर मला उचलून घरी घेवून आला होतास, सगळं आठवतं मला, आपलं मॅरेज पाहून कॉलेज च्या सगळ्या मुलां मुलींचा प्रेमावर विश्वास बसला होता,
आजही आपल्याप्रेमाची मिसाल देतात ते सगळे...पण!
          कोण सांगणार त्यांना कि तुला ऐशो आराम आता जास्त जवळ वाटू लागले होते, करियर ची झुळूक लागली होती,  मग तुझं वागणं पाहून तुझ्या आई बाबांनी ही माझ्या बाजूने उभे राहणे पसंत केले,  आणि मला तुझ्या पासून दूर राहण्याचा सल्ला ही,  कदाचित त्यांना माझ्या मनातलं कळालं असले,  ते घूसमटून जगणे त्यांना ही पटलं नसेल म्हणून त्यांनी च वकील पाहीला होता,  तु स्वतःला इतकं उच्च मानू लागला होता कि साधा स्वताःच्या आईबाबांचा ही तुला विसर पडत चालला होता. अखेर तुला डिव्होर्स देवुन मी नात्यांच्या घोळक्यातून सुटले खरी पण मुलगी म्हणून मिळालेलं सुनेचं नातं मला आजही बंधनांत बांधून ठेवतोय,
   तुला पुढे जायची सवय होती हे ओळखायला मला खूप वेळ लागला ,म्हणून कदाचित मी दिसावी यासाठी तु लास्ट बेंच वर बसायचास ,असाच विचार केला पण आज लक्षात आले कि तुला मागे वळून पहायचं नव्हत म्हणून तु लास्ट बेंच वर बसायचास...

#रिंकी

Comments

Popular posts from this blog