सफर

सफर.....

हाश्श् ...चला खिडकी बाजूची सीट मिळाली,  नाहीतर एवढ्या तिन दिवसांचाप्रवास अडचणीत करावा लागला असता,  मागच्यावेळी ही महिनाभर आधी रिझर्वेशन केलेलं, तरी सुद्धा वरची फ्लॅट सीट मिळाली होती तिन दिवस झोपून काढले होते,  खालच्या सीट वरच्या त्या आजी बाईंनी बाळा बाळा करून चांगलाच राबवून घेतला होता,  मी पण हो आजी हो आजी करत दोन  दिवस नोकर म्हणून राबलो त्यांचा., काय करणार त्याच्या सोबत एक गोड,सुंदर, अप्सरा सारखी दिसणारी मुलगी होती, मग काय माझं कोमल ह्रदय त्या परी साठी तरसला होता ना,  जशी देखणी ती तशीच गोड गळ्याच्या आवाजाची ही होती,  नखरेलू पण होती थोडीशी,  ''...पाणी बॉटल पाणी,  कोलड्रिंक, मैंगो,  माझा बॉटल ,पाणी '' बॉटल पाणी . ' ए पाण्याची बाटली दे एक '..' ये लो मौसी , पच्चिस रूपये ' ...काय?  पच्चिस रूपये?  अरे कितना लुटोगे,  ... ' हम किधर लूट रहा हूँ मौसी आपही लुटवा लेवत हो, ...दुई हज़ार का ऐसी का टिकट कटवा कर आराम से हराम सरकार की ज़ेब भर सकत हो,  और बिस रूपया कि पाणी बॉटल पच्चीस रूपया में नाही खरीद सकते हैं का , ...बरं दे असूदे तु तरी काय करणार,  देशाची सरकार असाही लुटतो तसाही लुटतो त्यात तुम्ही तुमचे रडणं गाता,  बोलायची सोयनाही असं म्हणत आजी बडबडू लागल्या वर मी पहिल्या दिवशीचा सायंकाळचा चहा माझ्या कडून दिल, तेव्हा थँक्यू म्हणाली होती ति, काय कोकीळ होता आवाजात,  वाह आजही घुमतोय., हलणा-या या डब्यात झोप काही येत नाही म्हणुन पुस्तक वाचायला घेतलं होतं, तिचंही असंच काही तरी होत असेल हे पाहण्यासाठी खालच्या सीट वर एक नजर फिरवावी म्हणून वाकलो तर आजी एकट्याच झोपलेल्या दिसल्या,  मी उठून खाली उतरलो आणि तीला शोधता शोधता ट्रेनच्या दारावर पोहोचलो,  ती दिसली आणि जीवात जीव आला,  मला पाहून हसली आणि आम्ही एकमेकांचा परीचय करून घेतलं,  खूपच सुंदर आणि साधे पण होता तिच्या बोलण्यात,  भाषेतला सौजन्य पणा निखळून दिसत होता,  आजीला जाग येईल आणि उठली कि ओरडेल म्हणून आम्ही दोघेही येवून एकमेकांच्या सीटवर लोळत पडलो,  कदाचित ती ही माझ्या च विचारात होती, ति ईतकी गोड होती कि मी तर तिला प्रपोज करणार होतो पण विचारा विचारात झोप कधी  लागली आणि सकाळ कधी झाली कळालं नाही,
    सकाळी ही चहा मी द्यावा असाच आजी चा विचार होता हे मला त्यांच्या 'बाळा तु चहा घेणार का' अस विचारल्यावर समजलं , हो म्हणत मी खाली येवून बसलो आणि माझी क्लास चालू झाली,  कुठं राहतो?  काय काम करतो? इथपासून ते किती माणसं आहेत घरात?  किती कमावतो इथपर्यंत विचारून झालं होतं,  दुपारी जेवण काही गेलं नाही,  प्रवासात जेवणं आजीबात होत नाही, रात्री थोडसं खाल्लं कटलेट आणि काय तो समोसा,  बेचव सगळं पण काय करणार आम्ही आणतो असले नेते निवडून,  मग बोलुन काही उपयोग नाही म्हणून गप्प बसलो, काल सारखी आजही तिच्याशी बोलण्याचा चान्स मिळाला तर प्रपोज करून टाकतो ह्याच विचारात होतो,  पण आजी ने आवाज दिला ' ए बेटा जरा सामान उतरायला मदत कर ना ' हे ऐकून तर मी सैरभैर झालो,  पटकन खाली उतरलो आणि ति उतरणार या विचारात इकडे तिकडे चकरा मारू लागलो,  जंक्शन जवळ आलं,  अनाउन्समेंट झाली आणि आजी म्हणाली तसं सामान घेऊन मागे मागे गेलो,  आधी ति उतरली मग आजी उतरली मी सामान ठेवलं आणि एक मोठा निःश्वास घेतला,  काही विचारायच्या आतच तिच्या घरचे सगळे तिला घ्यायला आले,  आजी सगळ्यांच्या गळ्यात पडून रडत होती आणि ति मला निहारत होती, तिला जाताना पाहून मन भरून आलं कधी गाडी हल्ली कळालेच नाही तिने हात वर करून बाय केले आणि आमच्यातले अंतर वाढत गेले,  आता खालची सीट माझी झाली आणि मी तिला गमवायच्या दु:खात माझी बॅग खाली उतरवली, माझी बूक पडली,  त्या बुक च्या पहिल्या पानावर एक चिठ्ठी होती, ज्यात लिहीले होते '' माझं लग्न ठरलं आहे,  या दोन दिवसांत तुम्ही मला स्वप्नातल्या राजकुमारासारखे भेटलात, मलाही तुम्ही स्वप्नातल्या राजकुमारी सारखेच विसरून जा, '' ......
    पण आज पुन्हा या नव्या प्रवासात तिची आठवण झाली,आणि ति आयुष्य भरासाठी माझ्या प्रवासाच्या स्वप्नातली राजकुमारी झाली,..

#रिंकी.........
   

Comments

Popular posts from this blog