रविवार ..

रविवार....

सकाळी फोन आला आईचा... 'मी आणि भाऊ जेवायला येतो तुझ्याकडे ' .....एकच दिवस मिळतो सुट्टीचा त्यात पन कोनी आलं घरी की एक्सट्रा काम वाढतं... नको वाटतं खरतर.... चिड चिड होते.. पन काय करनार पाहुनचार करन्यापलीकडे गत्यंतर नसतो....  'नाही मी आत्ताच नाश्ता केलाय ग आई! मी स्वयंपाक नाही करनार ' ...म्हनुन मी चिडुन उत्तर दिलं तीला.... 'त्यापेक्षा तुच बनव ना काहीतरी... मी आणि बाळ(माझा मुलगा) येतो जेवायला' ......
    मी अस म्हनताच तीची बडबड चालु झाली... ''आळशी कुठली काम नको करायला ''.....मी फोन कानापासुन लांब धरला.... जरा बडबड कमी झाली 'ये मग जेवायला '' ...वाक्य कानावर पडले आणि मी पुन्हा हसत फोन कानाजवळ आणला..... 'बरं बरं येते....... कामं आटपुन सगळे '.....
  रविवार म्हनला की आठवड्याभराची कामं आली.... त्यात कपडे म्हनायचे स्कुल यूनिफार्म आले, मग बेडशीट त्याचा सोबती उशीची कवरं, माझा एप्रन (कामावरचा कोट)  आला.... मग भांडे म्हटलं की त्यात सकाळ्या नाशट्याचे भांडे.,मग शेगडी -किचन वट्टा आला... तसतर रोजच ऐक हात फेरला जातो सफाईचा पन रविवारी कसं जरा लक्षपुर्वक करता येतात ही सगळी काम्.....
     उरकलीच होती जरा कामं तोच भाऊने कॉल केला... 'येतेस ना जेवायला... ''किती वेळ वाट पाहु''  ..तो लहान असला तरी माझ्या सोबत वेळ घालवायला त्याला आवडत... नाती जेव्हा वाढत्या वयात असतात तेव्हा वेगळीच अनुभुती मिळते नाही का... वागनं ही बदलतं... समंजस पना म्हनात ना तो हाच.... लहानपनी एकमेकांना विचारतही न्हवतो.... पन वेळेसोबत बदल हा घडुन येतोच.... ''आलीस का बस लवकर भुक लागलीय् केव्हाची महाराणी कुटली''.....मी हसु आवरलच होतं तोच आई ने त्याला दापत म्हनाली ''आहेच ती महाराणी... तु काओरडतोस तीला बसु तरी दे... लेकरुमाझं आठवडा झाला तीला पाहुन ''.....आईने माझी बाजु घेताच मी आकाश भ्रमणंती झाले नी आईच्या बाजुला जावुन बसले त्याला तोंड वाकडं करुन.... आयतं जेवन कोनाला नको हवं असतं अन् तेही आई च्या हाताचं..... पोट भरुन जेवन काय हे त्याच वेळी कळतं..... रोजच्या कामाचा व्यापात दोन घास कमी जेवनारी मी आज पोट भरुन जेवली असेल.....
    ''बस जरा का निघाली लगेच... जेवल्यावर लगेच असं निघु नये बाळा '...बाळा म्हनल्यावर मी काय मग हलुच वाटलं नाही... बसले फोन घेवुन भाऊ सोबत... आईने ताटं आवरुन लगेच चटई आनुन हातरली... ''पड बाई जराशी संध्याकाळचा चहा घेवुनच जा थांब आत्ता''... मी ही पाठीला टेक दिला जरा पडले चटईवर आई ही डोक्याजवळ येवुन झोपली..... सहज डोळे बंद केले होते मी तोवर आईने जो मायेचा हाथ फिरवला डोक्यावरुन आहा.... काय सांगु जगभराचं सुख लाभलं अंगी.... ती वेळ नाही., तो क्षण नाही मी शब्दात व्यक्त करु शकत... भाऊ ही गप होता... कदाचित् तो ही माझ्या असन्याचा अनुभव घेत होता पन बोलला काहीच नाही.... ''लेकरु माझ दमतं रे आठवडा भर घरातलं करा मग कामाला जा किती व्याप असतो तिला.... जेवनपन अंगी लागत नाही...कधीच्या काळात झोपली ती ईथे... नाहीतर जेवली की पळते एक क्षणही थांबत नाही''.... मी जागी होते पन डोळे मिटुन आईचे बोलने ऐकत होते.... भावाला माहीत होतं बरंका पन तोही आईला काही बोलला नाही..... कदाचित् ह्या क्षणाला त्यालाही साठवुन ठेवायचं होतं मनात........

(मी आळसपना केला पन मला आनंदी क्षण अनुभवायला मिळाले....)

रिंकी कुलकर्णी....

Comments

Popular posts from this blog