तु ये ना पुन्हा

तु ये ना पुन्हा...

सोबत चालना-या अबोल्या सावलीला बिलगून चालणारी पाऊलवाट होवून तु ये पुन्हा

तुझ्या मखमली ओठांचा स्पर्श होताच माझा सावळा रंग खुलतो त्या रंगात न्हाऊन तु ये पुन्हा

पावसाच्या हलक्या सरी सोबत मातीच्या गंधात मिसळून गंधाच्या सुगंधात उमजून तु ये पुन्हा

गुलमोहरावर धुक्याची रास रचून तो गारवा मोहरतो तसं गारव्याची शाल पांघरून तु ये पुन्हा

#रिंकी..




Comments

Popular posts from this blog

एक अनामिक नातं

न्यूड