मुक्त छंद




कधी कधी वाटतं खूप रडावं,
उशाशी आधार घेऊन तुझ्या स्वप्नात पडावं,
स्वप्न मी पहावं तु रात्र होशील का,
अंधारात चांदण्याचा दिवा तु हाथी घेशील का.
जागेपणी झोप यावी तु अलगूज निज हो ,
निजही निजते बघ तु हलका सा अनुवाद हो.
स्वप्नातल्या राजकुमारासारखा घे घोडस्वारी,
मग मी ही घेईल आकाशी नितांत भरारी.
तो संध्याकाळी चा गारवा तु जाताना देवुन गेलास,  हलकी शी हितगूज ती हव्याचा सोबती लेवून गेलास.असाच लोभ तुझ्या येण्याचा राहू दे,
काळजाच्या एका कोपर्यात मलाही हक्काने पाहू दे राया मलाही हक्काने पाहू......

#रिंकी......

Comments

Popular posts from this blog