इश्काचा पिसारा


ह्यो तुझा अल्लड सा साज, माझ्या पिरमाला लाजवीतो
तुला बघून येडं काळीज, ढोल इश्काचा वाजवीतो
त्या ढोलकिच्या तालावर मन नाचतो काहूरा
सखे तुला बघून खुलतो ग माझ्या इश्काचा पिसारा.. ।धृ।

रोज सपनात बांधीतो ग, तुझ्या नावाचा मी झूला
गंध दरवळतो बहरुन ए माझ्या मोगरीच्या फुला
तुझ्या केसाला बिलगून दरवळतो गंध सारा
सखे तुला बघून खुलतो ग माझ्या इश्काचा पिसारा ।धृ।

माझ्या प्रीतीच्या उन्हाला, तुझ्या सावलीची ओढ
नाजुकशी खळी गाली,  जशी साखरे हून गोड
तुझ्या ओठांवरच्या गोडीला मी आशिक आवारा
सखे तुला बघून खुलतो माझ्या ग माझ्या इश्काचा पिसारा

#रिंकी..

Comments

Popular posts from this blog