दोष

           दोष नेमका कोणाचा......?.

               डाग दिसतात चेहऱ्यावरचे म्हणून तीनं स्कार्फ गुंडाळला आणि दळण दळणयासाठी गिरणीच्या दिशेने वाट निवडली. घराला लाँक लावला आणि दळणाचा डबा कमरेवर ठेवणार तोच शेजारच्या काकूंनी आवाज दिला... '"अग अश्विनी किती सहन करनार आहेस अजून ,जा आईच्या घरी निदान दोन वेळेच जेवण तरी मिळेल तिथे,इथं या नराधमाच्या तावडीतून सुटशील तरी एकदाची.'" पण ती चेहर्यावरचा स्कार्फ सांभाळत डबा उचलून निघाली . घरापासून काही अंतरावर गिरणी होती.तीला पाहून गिरणीवाला पण थबकला. गेल्या ६ महिन्यात त्यालाही सवयच झाली होती हिला या अवस्थेत पहायची. लई थाटामाटात लग्न करून आणलं होत अनिलनं तिला. आख्खिचाळ गेलती लग्नाला.
            स्वर्गातून जोडा जमिनीवर उतरला होता जजणू. काय सुंदर दिसत होती आश्विनी आप्सरा पण कमी सुंदर दिसते .पहिल्या दोन महिन्यात काही कमी नव्हती गोडी संसारात पण जेव्हा पासून नवीन घरात प्रवेश केला तेव्हा पासून ती अप्सरा मोलकरीण दिसून येते. गिरणीच्या मागे भाड्याने राहत होता अनिल आणि त्याची बहिण तनुजा . अश्विनीलाही तनुजानेच पसंत केले होते. अनिलच लग्न लावून तनुजा महिन्याभरातच रोड एक्सिडेंट मध्ये जीव गमावून त्या दोघांना सोडून  निघून गेली. तनुजा असताना अनिलनं लोन काढून हे नवीन घर घेतला होतं. घरभरणीला पण जास्त दिखावा नाही केला अनिलने. आईसारखी असणारी तनुजा गेल्यावर अनिलने प्यायला सुरुवात केली होती . 
            मग रोज रात्री उशिरापर्यंत वाट पाहात उभी राहायची अश्विनी . कधी कधी तर घरी यायला पहाट व्हायची त्याला. अचानक मग ओरडा-भांडण याचा समावेश होत गेला यांच्या सुखी संसारात. हल्ली म्हणे तो ड्रग्सच्याही नादी लागला होता. मग काय रोज रोज पिनं वाढलं आणि अश्विनीची नरकयात्रा सुरु झाली होती. बिचारी गरीबी होते आई वडील म्हणून माहेरी ही जाता येते न्हवते. बिचारी नवर्याच्या पायाखालची चप्पल होवून बसली. हवी तेव्हा घातली हवी तेव्हा काढून घराच्या कोपर्यात फेकून दिली. एक दिवस असा येईल की हा अनिल स्वाताच स्वहताने संसाराची मशाल पेटवून घेईन. ह्या सगळ्या गोष्टी अश्विनी च्या ही लक्षात आले होते पण!.....
             दळण घेवुन अश्विनी घरी आली. स्वयंपाक करून झाला होता तिचा. नेहमी प्रमाणे आईशी फोनवर बोलली, मन भरून नैत्राच्यानसा फाटूस तो पर्यंत रडली. तिचा रडण्याचा आवाज ऐकून शेजारच्या काकूही अर्धजीव व्हायच्या पण ! आज रडण्याचा आवाज अचानक बंद झाला होता. रात्री उशिरा अनिल ने दार वाजवून वाजवून आख्खिचाळ जागी केलती .पण! आज दार उघडणारी अश्विनी मात्र कायमची निद्रिस्त झाली होती.........
          या सगळ्यात दोष कोणाचा. त्या गरिबीनी झपाटलेल्या अश्विनी च्या आई वडीलांचा की आई सारख्या बहिणीची माया डोक्यावरून निघून गेलेल्या अनिलचा की त्या अप्सरेचा जिने अवघ्या २४ व्या वयात नरकयात्रा भोगल्या .....

#रिंकी कुलकर्णी.......

Comments

Popular posts from this blog