कथा

स्थळ-: कॉलेज कॅंटीन

पात्रं-: तपस्वी, सायली, अनिल.

   ' असाइनमेंट पूर्ण झाले का तुझे ' ...अनिल

' नाही रे अजून गेले काही लेक्चर मिस झाले होते म्हणून राहीले त , ...सायली

' ए सन्नी कॉफी आण ना दोन प्लीज ' ......अनिल मागे वळून कॅंटीनबॉयला

' बरं इतकं काय त्यात ती तुझी डॉल बेबी आहे ना तपस्वी तीच्या कडून घे ना '.....अनिल कॅंटीनचा टेबल वाजवत

' तपस्वी?  तीच नाही आली कित्येक दिवस '....सायली नाराजगीने बोलते

' अरे तीला काय गरज कॉलेज ची , बिनधास्त गर्ल आहे ती , पब-शब , नाईट वेअर पार्टीस , पैसेवाली आहे ती शिवाय बड्या बापाची मुलगी!  ती का असाइनमेंट वगैरे करेल '......अनिल बुक्स चाळताना

' घ्या कॅफी.'.... सन्नी कॉफी ठेवून जातो

'मी देतो नोट्स कर पूर्ण असाइनमेंट!  वर्षे वाया नको घालवू'  ...अनिल बॅग उघडून

' थँक यू रे ' .....सायली नोट्स घेते

' पण तु नाराज का ' ...अनिल सायलीचा हाथ हथात घेतो

'मी नाराज नाही दुखावले आहे ' ...सायली भरलेल्या डोळ्यांतील पाणी पूसताना

'' ए वेडाबाई अग रडतेस का!  काय झालं ? तु मलाही नाही सांगणार का'' ...अनिल सायलीला मिठीत घेतो

'' तपस्वी यु एस ला गेली कायमची परत कधी न येण्यासाठी '' .....सायली हूंदका भरून रडते

'' का अस अचानक , आणि घरीच गेली ती यु एस ला!  येईल परत ''.....अनिल सायलीला खुर्चीवर बसवतो

' नाही ना!  तपू कधीच नाही येणार, she is hiv positive in last stage ! ,  .......सायली अनिलला बिलगून रडते

''ओह....नो.....''...अनिल डोक्याला हात लावतो...






Comments

Popular posts from this blog