एका नामांकीत भव्य दिव्य कलेचं ठिकाण असणार हे व्यासपीठ. त्या व्यासपीठाच्या एका छोट्याशा हॉलमध्ये एका मोठ्या गोलाकार असलेल्या बेड वर, अर्धवट टॉवेल गुंडाळून बसलेली . एक सुंदर उठावदार शरीराची सौंदर्य नार . तिच्या सौंदर्याची नक्षी तिच्या मखमली नग्न देहावरून दुधाच्या सायेसारखी मऊसर उठून दिसते . हॉलचा दरवाजा उघडून एक मुलगा त्या हॉल मध्ये प्रवेश करतो. आणि तिचं ते अर्धवट टॉवेल पूर्णपणे बाजुला जावून बसतो. मग एका पाठोपाठ एक कमी जास्त वयाच्या चित्रकांराची एंट्री होत जाते . कोणी तिला पाहतो तर कोणी न पाहिल्यासारखा करून आपल्या कामाला सुरवात करतो. कॅनवस पेपर काढणं, पेंटींग कलर काढणं, पेंटींगस्टॅंड व्यवस्थित ठेवून त्यावर योग्य पद्धतीने कॅनवस पेपर ठेवून पेंटींग ला सुरवात होते. कोणी तिला वासनेच्या नजरेत भरून घेवून मग कॅनवस पेपर वर उतरवतो, तर कोणी कलेची आवड घेवून तिला तिच्यासह नजरेच्या शहा-यात भरून त्या कॅनवस पेपरच्या कागदावर उतरवतो. कोणी तिला नजरेत कैद करून तर कोणी तिला एक जिवंत मुर्ती म्हणून निहारतो . तिच्या शरीराच्या प्रत्येक वलयाला कागदावर उतरवताना एक विलक्षण अनुभूती त्या चित्रकांराच्या कलेत