आई.

आई....
माझ्या कोरड्या आयुष्याला तुझ्या पदराचं ग उसान ...
मुलींच्या जन्मावर प्रश्न घेणा-याला मी दाखवीन मसान...

माझ्या आयुष्याच्या उसानाला आता जिंकायची ओढ लागली  आहे, मी आत्ता तुमच्या प्रेमाचा स्विकार करून माझ्या यशाला वाटेचे अडथळे नाही लावणार....

प्रेम ही खूपच सुंदर अनुभूती असते.  पण त्या पलीकडेही मला माझं आयुष्य जगायचं आहे.  मला माझं नाव कोरायचं आहे त्या दगडावर.  ज्या दगडावर मुलींचा जन्म नाशवंत म्हणून कोरलं जातं.  ज्या दगडावर मुलीच्या जन्मावर आक्षेप घेतला जातो .

आता जिंकण्याच्या पायरीवर मी थांबू शकत नाही.  मला माझ्या अस्तित्वाला ओळख द्यायची आहे.  मुलगी म्हणून जन्माला आले असले तरी, मी मुलांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहू शकेन असे यश मला मिळवायचं आहे.

आई.. किती लांब गेलीस ग मला सोडून . या पोकळ विचाराच्या समाजात मला आणि बाबांना एकटं टाकून का गेलीस (इथे खूप रडावं हीरोइन नं)...

तु पाहतेस ना तुझ्या निळ्या नभाच्या घरातून बाबा माझ्या साठी किती कष्ट घेत आहेत..

.'आई ' मला माहित आहे तु कुठेही नाही गेलीस मला सोडून.  माझ्या यशाची ढाल बनून माझ्या सोबत सावली सारखी उभी आहेस.

मी जिंकून आले कि त्या तुझ्या नभाच्या उंबरठ्यावरून माझं ओक्षण करशील ना गं.आयुष्य भर माझ्या उन्हाची सावली होशील ना गं

ज्या समाजात मुलींचा जन्म नाशवंत मानला जातो.  ज्या आईला मुली जन्माला घालतात म्हणून श्राप दिला जातो. त्या पोकळया विचारांच्या समाजाला माझ्या मुलगी असन्याचा अभिमान वाटेल. 


#रिंकी













Comments

Popular posts from this blog