एक सल मनाची

अन् एक सल....




          असं अचानक सोडून जाणं सोपं असता का रे.  त्या कॅफेशेजारून जाताना वाटायचं की तु आवाज देशील.  अचानक समोर येवून #सॉरी म्हणशील.  घरातून निघताना वाटायच की वाटेत कुठे तरी उभा असशील.  ठरलेल्या जागी तर लोचने भरभरून फिरायची.  कधीतरी दिसशील हा वेडा #भास छळायचा.  तु येशील पुन्हा हे माहित होतं. म्हणून राग कधीच आला नाही तुझ्यावर.  उलट भेटीची #ओढ दुप्पट झाली.  फोन ची साधी लाईट जरी लागली तरी वाटायचं की तुझा मेसेज असेल.  सारखं सारखं #मेसेज बॉक्स मधे जाउन तुझा फोटो पहायची.  कधी तरी वाटायचं की तुला तुझी स्पेस हवी मग उगाच या झुरणार्या वेड्या मनाला ओरडून समजवायचं.  मग थोडी चिडचिड थोडीशी  नाराजगी पण न चुकता तुझ्या फोटो ला पाहून सोबत घालवलेल्या क्षणांना साद घालायचा.  रिक्षा मधून जाताना कुठे तरी माझा पाठलाग करत असशील असे भास व्हायचे आणि तु नाही तिथे तु आहेस असं मुद्दाम डोळ्यांना सांगायचे.  तुझ्या वर चिडणं ओरडणं हा फक्त देखावा होता रे माझ्या मनाचा.  खरंतर तु माझ्या साठी काय आहेस याची जाणीव करून द्यायची नाही मला तुला.  तुझे माझ्या आयुष्यातले importants ची मला तुला सांगायचं नाही.  मन गुतण्यापलिकडे होतं हे सगळं.  #क्षितीज ही अपूर्ण पडेल इतकं तु माझ्या आयुष्यात #मॅटर करतोस.  हे मला तुला सांगायचं नव्हतं.  अगदी जसा हवा होता तसाच आहेस तू हेही मला तुला सांगायचं नव्हतं.  तुला कोड्यात ठेवणं आवडायचं मला.  तुझ्या चेहर्यावर चे प्रश्नार्थक भाव मला खुप आवडतात.  #Involving हा शब्द ही छोटा पडेल इतकी गुतली मी आणि तेही नकळत.  पण भिती असायची मनात.  की सोडून गेलास तर कसं सांभाळायचं मी मनाला.  कितपत तडा जाईल हा ही विचार नाही केला कधी. इतकं जास्त तु माझ्या आत कधी उमगलास हे माझ्या साठी कोंडच आहे.  आणि मला ते कोडं सोडवायचही नव्हतं.  

          पण सगळं अर्धवट टाकून निघून जाशील असं वाटलं नव्हतं रे. ज्या मनाला तडा जायची भिती होती ना त्याच मनाला मन उरलं नाही आता.  रोज सकाळी डोक्याखालची उशी ओली का व्हायची हे तुला कळेल का.  असाही प्रश्न आता उरला नाही आयुष्यात.  पण भास होतातच या तुटलेल्या मनला.  चाहूल येण्याची जाणवतेच त्याला.  काळीजातला ओलावा आता आपलासा वाटत होता.  एकांत ही एकांतला चिरुन जायचा जेव्हा तुझ्या स्पर्शाची लहर उसमळून यायची.  माझे गाल हसले की तुझी आठवण होवून मन ओल्याने पाझरायचं. वा-याचा स्पर्श झाला की  आठवायची ती मिठी जी प्रेमाच्या पलीकडे जाऊन मारली होती.  तुलाही मनात बोचले असतील का हे नात्यातले परखड काटे.  अशी शंका आता या तुटलेल्या #मनला जाणवू लागली.  

तुला घट्ट मिठी मारून खूप खूप रडायचं आहे. भरलेलं  काळीज तुझ्या मिठीत वहायचं आहे . दाबून धरलेला #हूंदका तुझ्या च स्पर्शने सोडायचा आहे.  सांगायचं आहे तुला की बघ मनात खोलवर जे दिसतंय ते फक्त आसवं नाही.  तु दिलेल्या जखमांचा ओला #गाभारा आहे.  जो फुटू पाहतोय.  जो #तळमळतोय वाहन्यासाठी.  



#रिंकी_तुटलेलं_काळीज_आणि_मी

Comments

Popular posts from this blog