न्यूड

एका नामांकीत भव्य दिव्य कलेचं ठिकाण असणार हे  व्यासपीठ.  त्या व्यासपीठाच्या एका छोट्याशा हॉलमध्ये एका मोठ्या गोलाकार असलेल्या बेड वर, अर्धवट टॉवेल गुंडाळून बसलेली . एक सुंदर उठावदार शरीराची सौंदर्य नार . तिच्या सौंदर्याची नक्षी तिच्या मखमली नग्न देहावरून दुधाच्या सायेसारखी मऊसर उठून दिसते .   हॉलचा दरवाजा उघडून एक मुलगा त्या हॉल मध्ये प्रवेश करतो. आणि तिचं ते अर्धवट टॉवेल पूर्णपणे बाजुला जावून बसतो.  मग एका पाठोपाठ एक कमी जास्त वयाच्या चित्रकांराची एंट्री होत जाते  .कोणी तिला पाहतो तर कोणी  न पाहिल्यासारखा करून आपल्या कामाला सुरवात करतो. कॅनवस पेपर काढणं, पेंटींग कलर काढणं, पेंटींगस्टॅंड व्यवस्थित ठेवून त्यावर योग्य पद्धतीने कॅनवस पेपर ठेवून पेंटींग ला सुरवात होते. कोणी तिला वासनेच्या नजरेत भरून घेवून मग कॅनवस पेपर वर उतरवतो, तर कोणी कलेची आवड घेवून तिला तिच्यासह नजरेच्या शहा-यात भरून त्या कॅनवस पेपरच्या कागदावर उतरवतो. कोणी तिला नजरेत कैद करून  तर कोणी तिला एक जिवंत मुर्ती म्हणून निहारतो . तिच्या शरीराच्या प्रत्येक वलयाला कागदावर उतरवताना एक विलक्षण अनुभूती त्या चित्रकांराच्या कलेतून दिसून येते . त्याच्या प्रत्येक रेषेसोबत तिचा नग्न पणा हळूहळू त्या कागदावर उतरतो. कोणी क्षणाचा विलंब न करता अवघ्या काही तासात तिच्या देहाला कागदावर विलीन करतो तर कोणी तिला एक जिवंत पेंटींग म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करतो. वेळेचे नियोजन असल्यामूळे एकही क्षण न गमावनं हे कुठल्याही कलाकारासाठी एक आव्हानच काम करतं.
वेळ संपली की तिनं टॉवेल गुंडाळून पुन्हा उद्याच्या भेटीसाठी उत्सुकता निर्माण करून द्यायचं.  कदाचित् या कलेचा आवाहन करतांना तिने मनाला लाजेच्या चौकटीतून कायमचं बाहेर काढलं असावं.  म्हणून वेळ संपल्यावर अंग झाकून बाहेर पडताना तिच्या नजरा तिच्या कलेचा अभिमानाने स्वागत करतात.  आणि उद्याच्या भेटीसाठी एक जोश निर्माण करून देतात. 
न्यूड पेंटींग हा चित्राचा म्हणजे कलेचाच एक भाग आहे.  या कलेला अंतरराष्ट्रिय पातळीवर उत्तम दाद दिली गेली आहे. तसा दर्जेदार प्रतिसाद हि मिळतोच म्हणा त्याहूनही म्हत्वाचे म्हणजे या कलेसाठी कलाकार मिळणं.   पाहिलं तर एका स्त्री साठी नग्न अवस्थेत तासनतास बसून राहणं हे किती भयानक असेल . तिची मानसिक तयारी सगळ्यात म्हत्वाची आणि त्यातही म्हत्वाच म्हणजे तिच्या ह्या अश्या कलेला समजून घेणं.  कुटुंब पद्धती आणि समाज या सगळ्या गर्दीतुन बाहेर पडून तिचं वेगळं अस्तित्व निर्माण करणं.  हे काही सोपं नसतं. 
कोणासाठी हे न्युड पेंटींग पोटभरण्याचं साधन असतं  तर कोणासाठी मन भुलणार छंद. कोणी या कलेचा प्रदर्शन करतो तर कोणी मनाला समाधान मिळेल म्हणून. पण! या सगळ्यात तिच्या मनावरची घालमेल कोणी समजून घेत असेल का.तिच्या साठी हा भाग रोजचा जरी असला तरी पण नग्न अवस्थेत येणं हे काही सोपं नाही तेही  वयाचं बंधन नसलेल्या तरूणांसमोर . हे तिचं रोजचं जरी काम असलं तरी एका सेकंदासाठीत सगळं बाजूला ठेवून विचार करून पाहणं गरजेचे वाटते. त्या चित्रकारांच्या  गर्दीत जूणे चेहरे आणि नवीन असे विभागलेले चेहरे असतात  .  जुन्या चेह-याचे कलाकार तिच्या मनाची तयारी होते तोवर वाट पाहतात आणि नवीन चेह-याचे कलाकार तिच्या टॉवेल उतरण्याची. ति मात्र आपली सगळी लाज त्या चित्रकारांसमोर अशी उघडी टाकते जशी एखादी प्रसव वेदना होते आणि यातनेच्या किंचाळीतून चित्राच्या रूपात नवजात बाळ जन्माला येतो .
    या न्युड फोटो सेशनचा विचार ही न्युड म्हणून च वावरतो हे हि तितकंच खरः आहे जितकं कि बाई नग्न  झाली कि तिची लाज दिसते आणि पुरूष नग्न झाला कि त्याची मरदानगी .
#रिंकी....

Comments

Popular posts from this blog