Posts

Showing posts from October, 2018

कोडं भाग तिन

तिचं सौंदर्य तो, नाजुकपणा, तिच्यातला निरागस भाव. अंतर दोघांनी ठेवलं होतं खरं पण आकर्षण कधी थांबत नाही.  सहाच महिने झाले होते तिला ड्युटी जॉईन करून.  अगदी काम असेल तरच ति बोल...

सफर

सफर..... हाश्श् ...चला खिडकी बाजूची सीट मिळाली,  नाहीतर एवढ्या तिन दिवसांचाप्रवास अडचणीत करावा लागला असता,  मागच्यावेळी ही महिनाभर आधी रिझर्वेशन केलेलं, तरी सुद्धा वरची फ्लॅट सीट मिळाली होती तिन दिवस झोपून काढले होते,  खालच्या सीट वरच्या त्या आजी बाईंनी बाळा बाळा करून चांगलाच राबवून घेतला होता,  मी पण हो आजी हो आजी करत दोन  दिवस नोकर म्हणून राबलो त्यांचा., काय करणार त्याच्या सोबत एक गोड,सुंदर, अप्सरा सारखी दिसणारी मुलगी होती, मग काय माझं कोमल ह्रदय त्या परी साठी तरसला होता ना,  जशी देखणी ती तशीच गोड गळ्याच्या आवाजाची ही होती,  नखरेलू पण होती थोडीशी,  ''...पाणी बॉटल पाणी,  कोलड्रिंक, मैंगो,  माझा बॉटल ,पाणी '' बॉटल पाणी . ' ए पाण्याची बाटली दे एक '..' ये लो मौसी , पच्चिस रूपये ' ...काय?  पच्चिस रूपये?  अरे कितना लुटोगे,  ... ' हम किधर लूट रहा हूँ मौसी आपही लुटवा लेवत हो, ...दुई हज़ार का ऐसी का टिकट कटवा कर आराम से हराम सरकार की ज़ेब भर सकत हो,  और बिस रूपया कि पाणी बॉटल पच्चीस रूपया में नाही खरीद सकते हैं का , ...बरं ...

कोडं भाग चार

कॉलेज च्या लास्ट बेंच वर बसायचास तु ...मला सहज पाहता यावं म्हणून,  ऑफ पिरेड मध्ये गाणी म्हणायचास,माझ्या आवडीचे कलर असलेले कपडे घालायचास,  किती छान होते ते दिवस, तुझं वेड्यासारखं पाहणं, मला आवडतं म्हणून ना आवडत्या विषयाच्या तासालाही हजर रहायचास,  आठवतं का तुला एकदा वॅलेंनटाईन डे निमित्त जांभळ्या रंगाच्या कपडे घालायची अट होती,  माझ्या कडे जांभळा रंगाचे कपडे नव्हते हे तुला माहित झालं तेव्हा!  माझ्या साठी जाभळी साडी घेवून,  हॉस्टेल च्या शिपाई काकांना मला द्यायला सांगितलं होतंस,  तेही रात्रीच्या अंधारात आला होतास , दुस-या दिवशी मी ती साडी नेसून आले तेव्हा कॉलेज कॅंटीनमध्ये तु माझ्यासाठी गुलाबाच्या फुलांचा गुच्छा आणि चॉकलेट चा केक आणला होतास, हा तुझा प्रपोज करण्याचा अंदाज मला खूप आवडला होता,  ते फिल्मी स्टाईल मध्ये गुडघ्यावर बसून, हातात फुलांचा गुच्छ घेवून तु मला प्रपोज केलं आणि मी कसलाही विचार न करता तु हो म्हणाले होते.          अगदी दोन महिन्यांनी लगेच आपन लग्न केले,  किती छान चाललं होतं सगळं ,मी तुझी लकी...