Posts

Showing posts from April, 2025

क्या खूब सुनाई

Image
क्या बताऊँ 

आरश्यातला प्रतिबिम्ब

Image
आरश्यातला प्रतिबिम्ब 

वैश्या

"वैश्या", read it on Pratilipi : https://marathi.pratilipi.com/story/O1rDtgdJet5Z?utm_source=android&utm_campaign=content_share Read, write and listen to unlimited contents in Indian languages absolutely free

न्यूड

एका नामांकीत भव्य दिव्य कलेचं ठिकाण असणार हे  व्यासपीठ.  त्या व्यासपीठाच्या एका छोट्याशा हॉलमध्ये एका मोठ्या गोलाकार असलेल्या बेड वर, अर्धवट टॉवेल गुंडाळून बसलेली . एक सुंदर उठावदार शरीराची सौंदर्य नार . तिच्या सौंदर्याची नक्षी तिच्या मखमली नग्न देहावरून दुधाच्या सायेसारखी मऊसर उठून दिसते .   हॉलचा दरवाजा उघडून एक मुलगा त्या हॉल मध्ये प्रवेश करतो. आणि तिचं ते अर्धवट टॉवेल पूर्णपणे बाजुला जावून बसतो.  मग एका पाठोपाठ एक कमी जास्त वयाच्या चित्रकांराची एंट्री होत जाते  . कोणी तिला पाहतो तर कोणी  न पाहिल्यासारखा करून आपल्या कामाला सुरवात करतो. कॅनवस पेपर काढणं, पेंटींग कलर काढणं, पेंटींगस्टॅंड व्यवस्थित ठेवून त्यावर योग्य पद्धतीने कॅनवस पेपर ठेवून पेंटींग ला सुरवात होते. कोणी तिला वासनेच्या नजरेत भरून घेवून मग कॅनवस पेपर वर उतरवतो, तर कोणी कलेची आवड घेवून तिला तिच्यासह नजरेच्या शहा-यात भरून त्या कॅनवस पेपरच्या कागदावर उतरवतो. कोणी तिला नजरेत कैद करून  तर कोणी तिला एक जिवंत मुर्ती म्हणून निहारतो . तिच्या शरीराच्या प्रत्येक वलयाला कागदावर उतरवताना एक व...

एक सल मनाची

अन् एक सल....           असं अचानक सोडून जाणं सोपं असता का रे.  त्या कॅफेशेजारून जाताना वाटायचं की तु आवाज देशील.  अचानक समोर येवून #सॉरी म्हणशील.  घरातून निघताना वाटायच की वाटेत कुठे तरी उभा असशील.  ठरलेल्या जागी तर लोचने भरभरून फिरायची.  कधीतरी दिसशील हा वेडा #भास छळायचा.  तु येशील पुन्हा हे माहित होतं. म्हणून राग कधीच आला नाही तुझ्यावर.  उलट भेटीची #ओढ दुप्पट झाली.  फोन ची साधी लाईट जरी लागली तरी वाटायचं की तुझा मेसेज असेल.  सारखं सारखं #मेसेज बॉक्स मधे जाउन तुझा फोटो पहायची.  कधी तरी वाटायचं की तुला तुझी स्पेस हवी मग उगाच या झुरणार्या वेड्या मनाला ओरडून समजवायचं.  मग थोडी चिडचिड थोडीशी  नाराजगी पण न चुकता तुझ्या फोटो ला पाहून सोबत घालवलेल्या क्षणांना साद घालायचा.  रिक्षा मधून जाताना कुठे तरी माझा पाठलाग करत असशील असे भास व्हायचे आणि तु नाही तिथे तु आहेस असं मुद्दाम डोळ्यांना सांगायचे.  तुझ्या वर चिडणं ओरडणं हा फक्त देखावा होता रे माझ्या मनाचा.  खरंतर तु माझ्या साठी काय आहेस याची जाणीव ...

आई.

आई.... माझ्या कोरड्या आयुष्याला तुझ्या पदराचं ग उसान ... मुलींच्या जन्मावर प्रश्न घेणा-याला मी दाखवीन मसान... माझ्या आयुष्याच्या उसानाला आता जिंकायची ओढ लागली  आहे, मी आत्ता तुमच्या प्रेमाचा स्विकार करून माझ्या यशाला वाटेचे अडथळे नाही लावणार.... प्रेम ही खूपच सुंदर अनुभूती असते.  पण त्या पलीकडेही मला माझं आयुष्य जगायचं आहे.  मला माझं नाव कोरायचं आहे त्या दगडावर.  ज्या दगडावर मुलींचा जन्म नाशवंत म्हणून कोरलं जातं.  ज्या दगडावर मुलीच्या जन्मावर आक्षेप घेतला जातो . आता जिंकण्याच्या पायरीवर मी थांबू शकत नाही.  मला माझ्या अस्तित्वाला ओळख द्यायची आहे.  मुलगी म्हणून जन्माला आले असले तरी, मी मुलांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहू शकेन असे यश मला मिळवायचं आहे. आई.. किती लांब गेलीस ग मला सोडून . या पोकळ विचाराच्या समाजात मला आणि बाबांना एकटं टाकून का गेलीस (इथे खूप रडावं हीरोइन नं)... तु पाहतेस ना तुझ्या निळ्या नभाच्या घरातून बाबा माझ्या साठी किती कष्ट घेत आहेत.. .'आई ' मला माहित आहे तु कुठेही नाही गेलीस मला सोडून.  माझ्या यशाची ढाल बनून माझ्या...

क्षणिक आठवण

एकदा तो म्हणाला होता 'बाळा माझं काम एकीकडे आणि माझं प्रेम एकीकडे'. आज हे अचानक आठवलं आणि चटकन डोळयात पाणी आलं.  अगदी डोळ्याच्या किनाऱ्यावर येऊन ते फक्तं वाहायच थांबलं. अंगावर शहारे आले आणि मनाचा गाभारा भरुन आला. जाणारे काही क्षण अचानक थांबले. मागे वळून पाहताना वाट एकाकी दिसली. मी भरलेल्या डोळ्यांनी हसले आणि पुन्हा एकदा सगळं नाहीसं झालं  तू दिसला नाही तर त्रास होतो विचारलं नाही तर त्रास होतो कैक दा भेटून हि भेट अपुरी वाटते मग भेटीच्या ओढीचा त्रास होतो  #रिंकी