ह्यो तुझा अल्लड सा साज, माझ्या पिरमाला लाजवीतो तुला बघून येडं काळीज, ढोल इश्काचा वाजवीतो त्या ढोलकिच्या तालावर मन नाचतो काहूरा सखे तुला बघून खुलतो ग माझ्या इश्काचा पिसारा.. ।धृ। रोज सपनात बांधीतो ग, तुझ्या नावाचा मी झूला गंध दरवळतो बहरुन ए माझ्या मोगरीच्या फुला तुझ्या केसाला बिलगून दरवळतो गंध सारा सखे तुला बघून खुलतो ग माझ्या इश्काचा पिसारा ।धृ। माझ्या प्रीतीच्या उन्हाला, तुझ्या सावलीची ओढ नाजुकशी खळी गाली, जशी साखरे हून गोड तुझ्या ओठांवरच्या गोडीला मी आशिक आवारा सखे तुला बघून खुलतो माझ्या ग माझ्या इश्काचा पिसारा #रिंकी ..