सफर..... हाश्श् ...चला खिडकी बाजूची सीट मिळाली, नाहीतर एवढ्या तिन दिवसांचाप्रवास अडचणीत करावा लागला असता, मागच्यावेळी ही महिनाभर आधी रिझर्वेशन केलेलं, तरी सुद्धा वरची फ्लॅट सीट मिळाली होती तिन दिवस झोपून काढले होते, खालच्या सीट वरच्या त्या आजी बाईंनी बाळा बाळा करून चांगलाच राबवून घेतला होता, मी पण हो आजी हो आजी करत दोन दिवस नोकर म्हणून राबलो त्यांचा., काय करणार त्याच्या सोबत एक गोड,सुंदर, अप्सरा सारखी दिसणारी मुलगी होती, मग काय माझं कोमल ह्रदय त्या परी साठी तरसला होता ना, जशी देखणी ती तशीच गोड गळ्याच्या आवाजाची ही होती, नखरेलू पण होती थोडीशी, ''...पाणी बॉटल पाणी, कोलड्रिंक, मैंगो, माझा बॉटल ,पाणी '' बॉटल पाणी . ' ए पाण्याची बाटली दे एक '..' ये लो मौसी , पच्चिस रूपये ' ...काय? पच्चिस रूपये? अरे कितना लुटोगे, ... ' हम किधर लूट रहा हूँ मौसी आपही लुटवा लेवत हो, ...दुई हज़ार का ऐसी का टिकट कटवा कर आराम से हराम सरकार की ज़ेब भर सकत हो, और बिस रूपया कि पाणी बॉटल पच्चीस रूपया में नाही खरीद सकते हैं का , ...बरं ...